नवी दिल्ली 18 डिसेंबर : सोशल मीडियाचं (Social Media) जग अतिशय वेगळं आहे. इथे दररोज मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Video Viral) होत राहतात. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. काही लोक तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट मिळाव्या यासाठी स्वतःचा जीवही धोक्यात घालतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Shocking Stunt Video Viral) होत आहे. यात दिसतं की एका तरुणाला बाईक स्टंट करणं चांगलंच महागात पडलं. या अतिविषारी सापाच्या सौंदर्यावर फिदा झाले लोक; यात असं आहे तरी काय? पाहा VIDEO व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुण बाईक स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओची सुरुवात पाहून असं वाटत नाही की पुढच्याच क्षणी या तरुणासोबत भलतंच काही घडणार आहे. हा तरुण अतिशय आऱामात बाईक हवेत उचलून स्टंट करताना दिसतो. मात्र काहीच सेकंदात जे घडत ते अतिशय भीतीदायक आहे. स्टंट करत असतानाच बॅलन्स बिघडतो आणि हा तरुण दुचाकीसह एक खांबाला जाऊन धडकतो. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
सड़क पर सुरक्षित चलें, स्टंटबाज़ी करै न कोय,
— Dipanshu Kabra (@ipskabra) December 16, 2021
दुर्घटना विक्राल होये कभी, परिवार फूट-फूटकर रोये. pic.twitter.com/hRa0CLTbtL
हा व्हिडिओ पाहून काही वेळासाठी तुमच्या काळजाचा ठोकाही चुकला असेल. अनेकदा स्टंटच्या नादात अशा काही घटना घडतात, ज्याचा विचारही आपण केलेला नसतो. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरुन शेअर केला गेला आहे. तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ इंडियन पोलीस सर्व्हिसचे अधिकारी दिपांशू काबरा यांच्या पेजवर पाहायला मिळेल. व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, रस्त्यावर सुरक्षित गाडी चालवा, स्टंटबाजीदरम्यान दुर्घटना घडू शकतात. थेट जंगलाच्या राज्यासोबत भिडली म्हैस; या लढाईचा शेवट पाहून व्हाल शॉक, VIDEO हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी या व्यक्तीच्या कृत्याबाबत राग व्यक्त केला आहे. तर काहींनी त्याची मस्करी केली आहे. एका यूजरने लिहिलं, हातपायाची हाडं तुटल्यास आयुष्यभरासाठी अपंग व्हाल. असा स्टंट करू नका, जो आयुष्यभर तुम्हाला रडवेल. आणखी एकाने कमेंट करत लिहिलं, स्वतःच्याच आयुष्यासोबत खेळतात. या लोकांचं आपल्या आयुष्यावर आणि कुटुंबीयांवर अजिबातही प्रेम नसतं.