मुंबई, 06 जून : देशातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. पण असं असलं तरी देखील काही भागात आजही कडक सुर्य प्रकाश आहे. ज्यामुळे चेहरा टॅन आणि निस्तेज होतं. पुरुषांपेक्षा महिलांची स्किन जास्त सेन्सिटिव असते. ज्यामुळे त्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी मुलतानी माती स्क्रब बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. अनेक लोक चेहरा उजळण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करतात. पण फक्त एवढच करुन चालनार नाही तर तुम्ही त्यामध्ये काही गोष्टी ऍड करा ज्यामुळे तुम्हाला ग्लो मिळायला आणखी मदत होईल. Unknown Fact : पुरुषांच्या तुलनेत महिलांचा जीन्स पॅन्टचा खिसा हा लहान का असतो? तसे पाहाता प्राचीन काळापासून त्वचेच्या केअरमध्ये मुलतानी मातीचा समावेश आहे. राजे-महाराजा आणि राणी देखील या मुलतानी मातीचा वापर करायचे. मुलतानी माती स्क्रब तुमची त्वचा गुळगुळीत आणि चमकदार बनवण्यास मदत करते. यासोबतच तुमची डेड स्किनही सहज काढली जाते ज्यामुळे तुमचा रंगही सुधारतो. तर नारळाच्या तेलामुळे त्वचेला खोल पोषण मिळतं, चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा मुलतानी मातीचा स्क्रब स्क्रब बनवण्यासाठी लागणारे साहित्य- 2 टीस्पून मुलतानी माती 1 टीस्पून नारळाचं तेल 1/4 टीस्पून साखर स्क्रब कसा बनवायचा? मुलतानी मातीचा स्क्रब बनवण्यासाठी सर्वप्रथम एक वाडगा घ्या. मग त्यात २ चमचे मुलतानी माती आणि 1 चमचा खोबरेल तेल घाला. यासोबत त्यात 1/4 चमचे साखर घाला. मग तुम्ही या सर्व गोष्टी नीट मिसळा. आता तुमचा मुलतानी मातीचा स्क्रब तयार आहे. Skin Care : त्वचेवर रोज लावा भेंडीचं पाणी, फरक पाहून विश्वास बसणार नाही हा स्क्रब कसा वापरावा? मुलतानी माती स्क्रब लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर तुम्ही तयार केलेला स्क्रब तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यानंतर, सुमारे 10-15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर तुम्ही हलक्या हातांनी स्क्रब करून चेहरा स्वच्छ करा. यानंतर, सामान्य पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर चेहऱ्यावर क्रीम किंवा लोशन लावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.