मुंबई, 06 जून : महिला आणि पुरुषांनी जीन्स पॅन्ट घालणं अगदी सामान्य झालं आहे. तुम्हाला रस्त्यावर सरास जीन्स घातलेले लोक दिसतील. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आणि महिलांपासून पुरुषांपर्यंत सर्वजण जीन्स पॅन्ट घातलेले दिसतात. पण तुम्ही कधी हे लक्षात घेतले आहे का की महिलांच्या जीन्स पँटचे खिसे हे पुरुषांच्या तुलनेत लहान असतात? खरंतर यामागे एक मोठं रहस्य आहे, ते जाणून तुम्हाला धक्का बसेल. जीन्स पँटच्या खिशाचा मुद्दा आता लैंगिक समानतेचाही विषय बनला आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगत आहोत. गारमेंट तज्ञांच्या मते, बहुतेक जीन्समध्ये लाइक्रा स्ट्रेच नावाचे फॅब्रिक असते. अशा स्थितीत पँटमध्ये खिसा तयार केल्यावर ते फॅब्रिक ताणले जाते, त्यामुळे पँट लवकर शेपलेस होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत महिलांच्या जीन्स पॅन्टमध्ये लहान खिसा असण्याचे हे एक प्रमुख कारण असू शकते. शरीराचा आकार बहुतेक स्त्रियांची कंबर वक्र आणि लहान असते. अशा परिस्थितीत महिलांची शरीरयष्टी बिघडण्यापासून वाचवण्यासाठी त्यांच्या जीन्स पँटचा खिसा छोटा ठेवला जातो. जेव्हा पँटचा खिसा लांब असतो तेव्हा त्यात भरपूर सामान ठेवलं जातं, त्यामुळे शरीराची आकृती खराब होण्याची शक्यता असते. स्त्रीयांची चाल देखील यामुळे बदलू शकते. म्हणूनच अनेक कंपन्या जीन्स पॅंटमध्ये लहान खिसे बनवतात. स्वस्त जीन्स गारमेंट उद्योगाशी संबंधित लोकांच्या मते, महिलांच्या जीन्स पँटच्या खिशात खिसा लहान असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे यासाठी लागणारा खर्च. खरे तर खिसा मोठा ठेवण्यासाठी मोठे कापड घालावे लागते. तर एक छोटासा खिसा लावून त्या कापडाची बचत होते. त्यामुळेच बहुतांश कंपन्या खर्च कमी करण्यासाठी छोटे खिसे ठेवतात. शिवाय असं देखील म्हटलं जातं की सुरुवातीला जिन्स पुरुषांसाठी बनवण्यात आल्या होत्या शिवाय. पुरुष प्रधान देश असल्यामुळे पैसे आणि इतर गोष्टी ठेवण्यासाठी पुरुषांना मोठे खिसे दिले गेले, तर महिला पुरुषांसोबत बाहेर जायच्या ज्यामुळे त्यांना कोणतीही गोष्ट किंवा पैसे सोबत ठेवण्याची गरज नव्हती, ज्यामुळे त्यांचे खिस लहान दिले गेले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.