मुंबई, 6 जून : हिरव्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. या हिरव्या भाज्यांपैकी एक म्हणजे भेंडी, ज्याची भाजी प्रत्येक घरात कधीना कधी बनवली जाते. परंतु भेंडी ही आपल्या आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर ठरते. भेंडीतून बाहेर पडणारा जेलीसारखा चिकट पदार्थ प्रत्यक्षात पोषक तत्वांनी भरलेला असतो, जो आपली त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतो. भेंडीमध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी 6 सारखे गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळतात. ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर करण्यात आणि निरोगी आणि हायड्रेटेड ठेवण्यात खूप मदत होते. भेंडीच्या पाण्याचे त्वचेसाठी असणारे फायदे जाणून घ्या. निरोगी त्वचा : भेंडीतून निघणारा जेलीसारखा चिकट पदार्थ हा प्रत्यक्षात जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण असतो. त्यामुळे त्वचा आतून निरोगी होण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सच भरपूर प्रमाणात आढळत. जे आरोग्यासोबतच त्वचेला यूव्ही किरणांच्या प्रभावापासून वाचवते आणि समस्यामुक्त ठेवण्यास मदत करते. Skin Care : दररोज फूट मसाज केल्याने चेहऱ्यावर येईल तेज, चमकदार चेहऱ्यासाठी या टिप्स फॉलो करा पिंपल्स समस्या : जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर ही समस्या दूर करण्यासाठी भेंडीचे पाणी प्रभावी ठरू शकेल. भेंडीच्या पाण्यातील पोषक तत्त्वांमुळे तुमच्या तवचेवरील फंगल, बॅक्टेरिया आणि पिंपल्सची समस्या दूर होऊ शकते. त्वचेचा कोरडेपणा होईल दूर : जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही भेंडीच्या पाण्याने त्वचा हायड्रेट करू शकता. भेंडीच्या पाण्याने त्वचेची नैसर्गिक चमक परत येते आणि चेहऱ्यावरील कोरडेपणा नाहीसा होतो.
सुरकुत्या कमी होतात : भेंडीचं पाणी शरीराला हायड्रेट ठेवते. ज्यामुळे कमी वयात चेहेऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या येत नाहीत. यामुळे चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी देखील प्रभावी भेंडीचे पाणी प्रभावी ठरते. भेंडीचे पाणी कसे तयार करावे ? ताजी भिंडी नीट धुवून चिरून घ्यावी. मग थोडं पाणी घेऊन ही भेंडी त्यात भिजवा. हळूहळू भेंडीतील जेलसारखा चिकट पदार्थ पाण्यात विरघळू लागेल. 15 मिनिटांनी हे पाणी चेहऱ्याला लावा. साधारण 15 ते 20 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. तुम्ही हे रोज करू शकता. पण याच्या वापरापूर्वी तुमच्या त्वचेवर एकदा स्किन पॅच टेस्ट करून घ्या.