मराठी बातम्या /बातम्या /Viral /

उंदरांचा इतका उच्छाद की सरकारही वैतागलं; बंदोबस्त करणाऱ्याला एक कोटी रुपयांची ऑफर

उंदरांचा इतका उच्छाद की सरकारही वैतागलं; बंदोबस्त करणाऱ्याला एक कोटी रुपयांची ऑफर

उंदरांना पळवण्यासाठी कोट्यवधी रुपये. (प्रतीकात्मक फोटो)

उंदरांना पळवण्यासाठी कोट्यवधी रुपये. (प्रतीकात्मक फोटो)

उंदरांना पळवून लावण्यासाठी सरकार तज्ज्ञाच्या शोधात आहे, यासाठी पॅकेजही जारी केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 02 डिसेंबर : बऱ्याच लोकांच्या घरात उंदीर असतात. उंदरांना पळवण्यासाठी उपाय केले जातात. पण काही वेळा या उंदरांना घराबाहेर काढणं म्हणजे आव्हान बनतं. काही केल्या उंदीर घराबाहेर जात नाहीत. याच उंदरांना पळवून लावण्यासाठी तुम्हाला कुणी पैसे दिले तर... उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्हाला कोट्यवधी रुपये मिळतील असं सांगितलं तर... काय आश्चर्य वाटलं ना... तुमचा विश्वास बसत नाही आहे का... पण हे खरं आहे.

एका शहरात उंदरांनी उच्छाद मांडला आहे. उंदरांच्या इतक्या तक्रारी आल्या आहेत की अगदी सरकारही या उंदरांना वैतागलं आहे आणि उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. या उंदरांना पळवून लावण्यासाठी सरकार तज्ज्ञाच्या शोधात आहे. उंदरांना पळवणाऱ्या तज्ज्ञाला कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली आहे.

हे वाचा - अंजलीच्या वेडिंग फोटोशूटमध्ये हत्तीचा धूमाकूळ; धक्कादायक VIDEO VIRAL

जगातील महासत्ता म्हणून ओळखलं जाणारं अमेरिकेतील हे प्रकरण आहे. इथलं न्यूयॉर्क शहर उंदरांना वैतागलं आहे.  2014 साली न्यूयॉर्क शहरात प्रत्येक व्यक्तीकडे अंदाजे दोन उंदीर होते. याचा अर्थ इथं आता उंदरांचा आकडा जवळपास एक कोटी 80 लाख आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत 2022 च्या सुरुवातीच्या आठ महिन्यांत उंदरांबाबत 70% तक्रारी आल्या. त्यावर कारवाई करण्यात आली आहे. उंदरांची दहशत रोखण्यासाठी नवा कायदाही आणला जाणार आहे.

दरम्यान उंदरांपासून सुटका मिळवण्यासाठी न्यूयॉर्क सरकार तज्ज्ञांच्या शोधात आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार यासाठी वर्तमानपत्रात याची अधिकृत जाहिरातही देण्यात आली आहे.  उंदरांना पळवण्यासाठी त्या तज्ज्ञाला 170,000 डॉलर म्हणजे जवळपास एक कोटी 13 लाख रुपयांचं पॅकेजही जारी केलं आहे. या तज्ज्ञाच्या पात्रतेचे निकषही या जाहिरातीत देण्यात आले आहेत. यामध्ये पदवी, शत्रूशी लढण्याची जिद्द, प्रवृत्तीचा असायला हवा असंही या जाहिरातीत नमूद कऱण्यात आलं आहे.

हे वाचा - पाण्यावर धावणारा सरडा कधी पाहिलाय का? वन अधिकाऱ्यांनी उघड केलं सरड्याच्या सुपरपॉवर मागील गुपित

आता या शहरातील उंदरांचा बंदोबस्त कसा होईल हे माहिती नाही पण तुमच्या घरातल्या उंदरांना तुम्ही वैतागला असेल तर यावरील उपाय आम्ही तुम्हाला देतो.

उंदीर होऊ नयेत यासाठी नैसर्गिक उपाय

पेपरमिंट ऑईल - उंदरांना पेपरमिंट ऑईलचा वास अजिबात आवडत नाही, त्यामुळे याचा वापर करून उंदरांना आपण घराबाहेर पिटाळून लावू शकतो. यासाठी तुम्ही कापसाचे काही गोळे शुद्ध पेपरमिंट तेलात भिजवून ठेवा आणि अशा ठिकाणी ठेवा जेथे उंदीर अनेकदा दिसतात. हे कापसाचे गोळे काही दिवसांनी बदलत राहा जेणेकरून त्यांचा वास पुन्हा येत राहील.

लवंगा - लवंग ही चवीला कडवट-तिकट आणि मसालेदार असते, याचा उपयोग आपण उंदरांना पळवून लावण्यासाठी करू शकतो. यासाठी काही पूर्ण लवंगा कापडाच्या तुकड्यांमध्ये बांधून उंदीर येण्याच्या जागी ठेवा. तुम्ही कापसात भिजवून लवंग तेल देखील वापरू शकता.

लाल मिरची - उंदीर देखील लाल मिरचीपासून लांब राहतात. ज्या ठिकाणी उंदीर दिसतील त्या ठिकाणी तुम्ही लाल तिखट शिंपडा. पण घरात लहान मुले आणि पाळीव प्राणी असतील तर लाल मिरच्या जुन्या कपड्यात बांधून ठेवू शकता.

कांदे - कांद्याच्या उग्र वासानेही उंदीर पळून जातात. उंदीर येण्याच्या जागांवर किंवा घराभोवती ताजे कांदे ठेवा आणि नियमित बदलत राहा.

बेकिंग सोडा - बेकिंग सोडा अशा ठिकाणी ठेवा जेथे उंदीर वारंवार येतात. बेकिंग सोडा रात्रभर टाकून ठेवा. सकाळी पावडर पुसून टाका. ही पद्धत दोन ते तीन दिवस पुन्हा करा.

First published:

Tags: Other animal, Viral, Viral videos, World news