मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अंजलीच्या वेडिंग फोटोशूटमध्ये हत्तीचा धूमाकूळ; धक्कादायक VIDEO VIRAL

अंजलीच्या वेडिंग फोटोशूटमध्ये हत्तीचा धूमाकूळ; धक्कादायक VIDEO VIRAL

कपलची एंट्री होताच चवताळला हत्ती.

कपलची एंट्री होताच चवताळला हत्ती.

कपलचं वेडिंग फोटोशूट सुरू असताना अचानक हत्ती चवताळला आणि त्याने हल्ला केला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

तिरुवनंतपुरम, 01 डिसेंबर : या वर्षातील शेवटचा महिना. या महिन्यात या वर्षातील लग्नाचे अवघे काही मुहूर्त शिल्लक आहेत. बऱ्याच ठिकाणी लगीनघाई दिसून येते आहेत. मराठमोळं सेलिब्रिटी कपल अंजली आणि राणादा म्हणजे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचाही लग्नसोहळा सुरू झाला आहे. अशात एका वेडिंग फोटोशूटचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात कपलच्या फोटोशूटमध्ये हत्तीने धूमाकूळ घातला आहे.

सोशल मीडियावर बरेच वेडिंग व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही मजेशीर काही भावुक असतात. पण हा व्हिडीओ मात्र धक्कादायक आहे. कारण यामध्ये घडलंच तसं आहे. कपल आपलं रोमँटिक फोटोशूट करत असताना अचानक हत्ती चवताळला आणि त्याने हल्ला केला आहे.

हे वाचा - नवरदेवानं सगळ्यांसमोर Kiss करताच नववधूनं नाकारलं लग्न कारण...

व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला एक हत्ती दिसत आहे. त्यानंतर नवरा-नवरी हातात हात घालून येतात. दोघंही हत्तीसमोर येऊन उभे राहतात. हत्तीवर महावत बसलेले आहेत जे हत्तीला कंट्रोल करत आहेत. कपल तसं आधीपासूनच हत्तीला घाबरताना दिसतं आहे. फोटो काढताना ते मागेही वळून पाहतात. त्यांच्या मनातील भीती खरी ठरते.

हत्ती अचानक चवताळतो. जसे वधू-वर त्याच्या जवळ जातात तसा तो संतप्त होतो आणि आपल्या पाठीवर बसलेल्या महावतांना खाली फेकण्याचा प्रयत्न करतो. एक महावत त्याच्या पाठीवरून जमिनीवर पडतो. त्यावेळी हत्ती त्याच्यावर हल्ला करतो. त्याचे कपडे सोंडेने काढून घेतो. सर्वजण घाबरतात आणि हत्तीपासून दूर पळतात. हत्तीवर बसलेला महावत कसंबसं त्या हत्तीला शांत करतो. नाहीतर मोठी दुर्घटना झाली असती.

हे वाचा - तुम्ही जे म्हणाल ते तो ऐकेल; नवरा-BF ला मुठीत ठेवण्याचे ऑनलाईन धडे देते महिला

weddingmojito  इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. माहितीनुसार ही घटना केरळच्या गुरूवायूर मंदिरातील आहे. जिथं हे कपल वेंडिंग फोटोशूटसाठी आलं होतं. निखील आणि अंजली असं या दाम्पत्याचं नाव आहे. व्हिडीओतून कपलने आपल्या लग्नाच्या फोटोशूटमधील हा क्षण आवर्जून दाखवला आहे. ही घटना आपण आयुष्यात कधीच विसरणार नाही, असंही या व्हिडीओत हे कपल सांगतं.

तुमच्या किंवा इतर कुणाच्या लग्नात तुम्ही काही अशी घटना पाहिली असेल तर आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा.

First published:

Tags: Elephant, Viral, Viral videos, Wedding, Wedding video, Wild animal