जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पाण्यावर धावणारा सरडा कधी पाहिलाय का? वन अधिकाऱ्यांनी उघड केलं सरड्याच्या सुपरपॉवर मागील गुपित

पाण्यावर धावणारा सरडा कधी पाहिलाय का? वन अधिकाऱ्यांनी उघड केलं सरड्याच्या सुपरपॉवर मागील गुपित

व्हायरल

व्हायरल

ट्विटरवर नेहमी अॅक्टिव्ह असणारे वन अधिकारी (आयएफएस) सुशांत नंदा यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात पाण्यात उडी मारून सरडा त्यावर धावताना दिसत आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 1 डिसेंबर : एरवी शॅमेलिऑन सरड्याच्या रंग बदलण्याबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण तोच सरडा पाण्यावर तुरुतुरू धावू लागतो तेव्हा आश्चर्याचा सुखद धक्का बसल्याशिवाय राहत नाही. ट्विटरवर नेहमी अॅक्टिव्ह असणारे वन अधिकारी (आयएफएस) सुशांत नंदा यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात पाण्यात उडी मारून सरडा त्यावर धावताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओवर नेटिझन्स प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तसं पाहायला गेलं तर या जगात माउंट एव्हरेस्ट सर करणं तसंच खोल पाण्यात काही मिनिटांपर्यंत श्वास रोखून थांबण शक्य आहे. पण एखादा जीव पाण्यावर चालतो किंवा धावतो असं म्हटलं तर आपणाला विश्वास बसणार नाही. माणसाला तर ही बाब केवळ अशक्य आहे. परंतु, काही वन्यजीव मात्र पाण्यावर धावण्याची किमया साधू शकतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सरडा आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत ते स्पष्ट दिसत आहे. सरड्याला पाण्यावर धावण्याचं कौशल्य कसं प्राप्त होतं असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. यावर सुशांत यांनी उत्तर दिलं आहे.

    जाहिरात

    सरडा पाण्यावर धावण्यामागे भौतिकशास्त्र शेअर केलेल्या व्हिडिओत दिसतं त्याप्रमाणे सरडा पाण्यात असलेल्या एका लाकडाच्या दांड्यावरून पाण्यात उडी घेतो. त्यानंतर तो अगदी गतीने पाण्यावर चालताना दिसत आहे. तो पळत असताना काही प्रमाणात पाणी मागे उडत असल्याचं दिसतं. सरड्याला पाण्यावर चालणं कसं काय शक्य आहे याचं उत्तर सुशांत यांनी दिलं. ते म्हणाले की, भौतिकशास्त्राचा गुणधर्म प्रत्येक ठिकाणी लागू होऊ शकतो. सरडा धावत असताना पृष्ठभागावर ताण निर्माण होतो. तो ताण पाण्याच्या अणूंसोबत येतो तेव्हा लहान वन्यजीवांना पाण्यावर चालण्यासाठी मदत होते. या व्हिडिओत सरडा पाण्याला मागे ढकलतानाही दिसत आहे. याचाच अर्थ पाण्याच्या पृष्ठभागावरील ताण पाण्याच्या अणुसोबत आल्याने ही किमया साधली गेली आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    व्हिडिओवर लोकांनी दिल्या प्रतिक्रिया सरडा पाण्यावर धावत असलेल्या व्हिडिओला 888 पेक्षा अधिक लाईक मिळाले. तर 94 जणांनी याला रिट्विट् केलं आहे. काही जणांनी त्यांची प्रतिक्रियाही नोंदवली आहे. एका नेटिझनने पालीवर प्रश्न विचारला. पाल ही जीझस लिझर्ड आहे की, दक्षिण अमेरिकेत आढळणारी बेसिलिस्क याचा उलगडा करण्याची विनंती या वेळी करण्यात आली. पाल भारतीय प्रजाती आहे का? असाही प्रश्न विचारला गेला. सरड्याबद्दल बोलताना माशांना गिळणाऱ्या पालीला मिस केलं जाऊ नये, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका युजरने दिली. पाण्यावर एखादा वन्यजीव इतक्या सहजपणे चालू शकतो यावर आपला विश्वास नसल्याचं दुसऱ्या एकानं सांगताना व्हिडिओ मात्र उत्तम असल्याचं म्हटलंय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात