मुंबई 18 ऑक्टोबर : बहुतेक लोकांच्या घरी ही एक कॉमन समस्या आहे ती म्हणजे उंदीर. एकदा का उंदीर घरात घुसले की काहीही केल्या ते घरातून बाहेर जात नाहीत. उंदरांच्या धुडगुसीमुळे घरातील वस्तुंचे नुकसान होतेच. शिवाय त्यांच्या विष्टेमुळे एक विचित्र प्रकारचा वास येऊ लागतो. तसेच यामुळे रोगराई देखील पसरते. अशावेळी मग शेवटी उंदरांना मारण्याचं औषध घालण्याशिवाय लोकांकडे कोणताच पर्याय उरत नाही. पण औषध घालण्याचा देखील दुषपरिणाम आहे. कारण जर उंदीर घरी मेला तर त्याचा वास येऊ लागतो आणि त्याला किडे देखील पडतात. अशातच जर अडगळीच्या जागी उंदीर मेला तर मग वाटच. पण आता काळजी करु नका. आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय आणि टिप्स सांगणार आहोत, जे तुम्हाला उंदरांना घरातून पळवण्यासाठी मदत करतील. कांद्याचा वास कांद्यापासून निघणारा वास विषारी असतो, त्यामुळे उंदीर पळून जातात. त्यामुळे उंदरांना पळवण्यासाठी कांद्याचा वापर करा. घराच्या मधोमध आणि उंदरांच्या जागी कांद्याचा रस किंवा कांदा कापून ठेवू शकता. लक्षात ठेवा की तो कांदा तुमच्या आहारात किंवा जेवणात येऊ देऊ नका. काय सांगता! डान्स फ्लोअरवर नाचणार्यांच्या ऊर्जेमुळे गरम होतं शेकडो लिटर पाणी लाल तिखट लाल तिखट चांगल्या-चांगल्यांना पळवून लावू शकते, मग उंदीर त्यातून कसा सुटणार? घरातील उंदरांपासून सुटका करण्यासाठी पुढील गोष्टीचा अवलंब करा. घराच्या दाराजवळ आणि किचनच्या काउंटरवर लाल तिखट शिंपडा. या ठिकाणी उंदीर सर्वाधिक दिसतात आणि याच्या मदतीने तुम्हाला ते पुन्हा दिसणार नाहीत. लसूण एका ग्लास पाण्यात लसूण किसून चांगले मिसळा. हे पाणी ज्या ठिकाणी उंदीर फिरतात त्या ठिकाणी शिंपडा. उंदीर लसणापासून दूर पळतात. हे मिश्रण अधिक प्रभावी करण्यासाठी तुम्ही त्यात काही लवंग टाकू शकता.
लवंग तेल लवंगाचं तेल लहान उंदीर दूर करण्यासाठी काम करते. त्याच्या वापरासाठी, लवंगाच्या काही कळ्या मलमलच्या कपड्यात बांधून उंदरांच्या बिळामध्ये ठेवा. त्यामुळे उंदीरही पळून जातील आणि परत जाण्याची भीती वाटू लागेल.