नवी दिल्ली, 08 जून : मोबाईल चोरी ला गेला की डेटा लीक होण्याची भीती असते. मला माझा मोबाईल फोन परत मिळेल नाही, अशी चिंता लागून राहते. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चोरीला गेलेला फोन मिळेल या आशेवर बरेच लोक राहतात. तर काही जण तो आता परत मिळेल याची आशाच सोडतात. पण एक अशी ट्रिक ज्यामुळे चोरच तुमचा चोरलेला मोबाईल तुम्हाला परत आणून देईल. एका आयपीएस अधिकाऱ्याने अवघ्या 45 सेकंदाच्या व्हिडीओतून ही ट्रिक दाखवली आहे. आयपीएस ऑफिसर अशोक कुमार यांनी अगदी सोप्या पद्धतीने चोरीला गेलेला फोन तुम्ही परत कसा मिळवू शकता, हे सांगितलं आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलं आहे. मोबाइल चोरीला गेला आणि पोलिसात जाण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ नसेल तर या माहितीचा तुम्हाला उपयोग होईल. Mobile Tracking System : चोरीला गेलेला स्मार्टफोन शोधून काढणार `ही` नवी सिस्टीम, नेमकं काय आहे खास? व्हिडिओमध्ये चोरीला गेलेला फोन कसा ब्लॉक करायचा? हे दाखवलं आहे. यासाठी सर्वात आधी तुम्हाला फोनचे बिल आणि एफआयआरची प्रत सोबत मोबाईलचा आयएमईआय नंबर गोळा करावा लागेल. यानंतर तुम्हाला नमूद केलेल्या वेबसाइटवर जावं लागेल आणि तिथं चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाइल ब्लॉक करण्याचा पर्याय निवडा, त्यानंतर एक फॉर्म उघडेल, ज्यामध्ये विचारलेली माहिती भरा. iPhone चोरताना चेहरा लपवण्यासाठी डोक्यात घातला पुठ्ठ्याचा बॉक्स; पण ऐनवेळी चोराची भलतीच फजिती, CCTV मध्ये कैद मोबाईल चोरीची तक्रार करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमची तक्रार नोंदवा. यामुळे चोर तुमचा मोबाईल वापरू शकणार नाही आणि तो स्वतःच तुम्हाला परत आणून देईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
🚨 मेरा मोबाइल गुम हो गया है! 😫
— Ashok Kumar IPS (@AshokKumar_IPS) June 6, 2023
सबसे पहले, चिंता न करें। यदि आपके पास समय की कमी है और आप पुलिस के पास नहीं जा सकते हैं, तो यह जानकारी आपके बहुत काम आएगी।
इस चोरी की शिकायत के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और अपनी शिकायत दर्ज करें। इससे चोर आपके मोबाइल का उपयोग नहीं कर… pic.twitter.com/0hWAvPgade
या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमची यावरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.