जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Mobile Tracking System : चोरीला गेलेला स्मार्टफोन शोधून काढणार `ही` नवी सिस्टीम, नेमकं काय आहे खास?

Mobile Tracking System : चोरीला गेलेला स्मार्टफोन शोधून काढणार `ही` नवी सिस्टीम, नेमकं काय आहे खास?

चोरीला गेलेला स्मार्टफोन शोधून काढणार `ही` नवी सिस्टीम, नेमकं काय आहे खास?

चोरीला गेलेला स्मार्टफोन शोधून काढणार `ही` नवी सिस्टीम, नेमकं काय आहे खास?

Mobile Tracking System : हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाइलसाठी सरकार देशव्यापी ट्रॅकिंग प्रणाली सुरू करत आहे. यामुळे हरवलेला किंवा चोरीला गेलेला स्मार्टफोन सहजपणे शोधून काढता येणार आहे. या नवीन प्रणालीविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 16 मे : आता बहुतांश गोष्टी ऑनलाइन झाल्याने साहजिकच स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. गेल्या काही वर्षांत स्मार्टफोन युझर्सची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. वस्तू कोणतीही असली तरी ती काळजीपूर्वक सांभाळणं आपल्या हातात असतं. काही वेळा स्मार्टफोन हरवणं किंवा चोरी होणं यांसारख्या घटना आपण पाहतो, अनुभवतो. खरं तर सध्याच्या काळात स्मार्टफोन हरवणं किंवा चोरीला जाणं म्हणजे वॉलेट, चाव्या आणि पर्सनल कम्प्युटर एकाच वेळी गमावण्यासारखं आहे. या समस्येवर भारत सरकारने एक महत्त्वपूर्ण उपाययोजना केली आहे. त्यामुळे स्मार्टफोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तुम्हाला फारशी चिंता करावी लागणार नाही. हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाइलसाठी सरकार देशव्यापी ट्रॅकिंग प्रणाली सुरू करत आहे. यामुळे हरवलेला किंवा चोरीला गेलेला स्मार्टफोन सहजपणे शोधून काढता येणार आहे. या नवीन प्रणालीविषयी सविस्तर जाणून घेऊ या. सेंटर फॉर डिपार्टमेंट ऑफ टेलिमॅटिक्स अर्थात सीडॉट 17 मे रोजी संपूर्ण देशात सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर म्हणजे सीईआयआर ही प्रणाली कार्यान्वित करत आहे. या प्रगत तंत्रज्ञानाची दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि ईशान्य भारतातल्या अनेक भागांत प्रायोगिक टप्प्यात यशस्वी चाचणी घेण्यात आली. हरवलेले किंवा चोरीला गेलेले स्मार्टफोन ट्रॅक आणि ब्लॉक करण्यासाठी हे तंत्रज्ञान तयार करण्यात आलं आहे. या तंत्रज्ञान प्रणालीने आपली क्षमता यापूर्वीच सिद्ध केली आहे. कर्नाटकात पायलट प्रोजेक्टअंतर्गत या सीईआयआर प्रणालीचा वापर केला गेला. या प्रणालीचा वापर करून कर्नाटक पोलिसांनी आतापर्यंत हरवलेले 2500पेक्षा जास्त स्मार्टफोन शोधून काढत ते त्यांच्या मालकांच्या हाती दिले आहेत. CNG भरताना लोक वाहनातून का बाहेर उतरतात? हा नियम नाही तर ही चार मोठी कारणे सीईआयआर ही प्रणाली केवळ स्मार्टफोन ट्रॅकिंगसाठी वापरली जाणार नसून, फोन चोरी रोखण्यातही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कारण यामुळे चोरीचे मोबाइल निरुपयोगी ठरणार आहेत. ही प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर चोरीचे फोन ट्रॅकमधून निसटून जाणार नाहीत. तसंच क्लोन केलेल्या फोनचा बेकायदा वापर करणं भूतकाळात जमा होणार आहे. सीईआयआर ही प्रणाली आयएमईआय (इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी) वापरून कार्य करणार आहे. हा 15 अंकी क्रमांक प्रत्येक स्मार्टफोनला असतो. हा आयएमईआय क्रमांक भारतात कोणत्याही मोबाइल डिव्हाइसच्या विक्रीपूर्वी उघड करणं अनिवार्य आहे. समजा तुमचा स्मार्टफोन हरवला अथवा चोरीला गेला की तुम्ही अधिकाऱ्यांकडे या आयएमईआय क्रमांकाच्या आधारे तक्रार करू शकता. तुम्ही तक्रार दाखल केल्यावर सीईआयआर प्रणाली सर्व नेटवर्कवर तुमच्या फोनचा आयएमईआय नंबर ब्लॉक करील, ज्यामुळे तुमचा फोन अन्य कोणाला वापरणं शक्य होणार नाही. स्मार्टफोनच्या चोरीला आळा घालण्याव्यतिरिक्त या प्रणालीचे आणखी काही उपयोग आहेत. या प्रणालीमुळे क्लोन मोबाइल फोनचा वापर करणं अशक्य होणार आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांचं निराकरण होणार आहे. शिवाय या प्रणालीच्या मदतीने ग्राहकांमध्ये बाजारातल्या बनावट किंवा क्लोन केलेल्या मोबाइलविषयी जागरूकता निर्माण करता येणार आहे. सीईआयआर प्रणालीचे आर्थिक फायदेदेखील आहेत. या प्रणालीमुळे स्मार्टफोनची तस्करी, बेकायदेशीर विक्रीला आळा बसणार आहे. तसंच यामुळे होणारं महसुलाचं नुकसान टाळता येणार आहे. एकूणच, सरकारने सीईआयआर प्रणालीच्या माध्यमातून स्मार्टफोन सुरक्षेसाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. त्यामुळे आता स्मार्टफोन हरवला किंवा चोरीला गेला तरी चिंता करण्याची अजिबात गरज नाही.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात