मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तुमचा फोननंबर ब्लॉक केलाय असं तुम्हाला वाटतंय का? काळजी करु नका, ही ट्रीक वापरा, लगेच होईल खरं खोटं

तुमचा फोननंबर ब्लॉक केलाय असं तुम्हाला वाटतंय का? काळजी करु नका, ही ट्रीक वापरा, लगेच होईल खरं खोटं

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

तुम्ही केव्हाही आणि कुठेही तुमच्या जवळच्या लोकांशी फोन करुन बोलू शकता. परंतू जस जशी टेक्नोलॉजी पुढे गेली आहे तसतशी त्याचे फायदे आणि तोटे वाढले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 06 ऑक्टोबर : आजच्या जगात फोन ही खूपच महत्वाची गोष्ट झाली आहे. कारण आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक कामांसाठी आपण त्याच्यावर अवलंबून राहातो. त्यामुळे आपण फोन शिवाय एक दिवस देखील राहू शकत नाही. सुरुवातीच्या काळात लोकांना फोन करण्यासाठी जास्त पैसे लागायचे परंतू आता तुम्ही कोणालाही फोन करा तुम्हाला त्यासाठी पैसे भरावे लागत नाही. फक्त तुम्हाला महिन्याला एका रिचार्ज मात्र करावा लागतो.

त्यामुळे तुम्ही केव्हाही आणि कुठेही तुमच्या जवळच्या लोकांशी फोन करुन बोलू शकता. परंतू जस जशी टेक्नोलॉजी पुढे गेली आहे तसतशी त्याचे फायदे आणि तोटे वाढले आहेत. ज्यामध्ये फोन नंबर ब्लॉक करने ही समस्या देखील उद्भवते. परंतू अशा परिस्थितीत, प्रश्न पडतो की तुम्हाला कोणीतरी ब्लॉक केलं आहे हे कसे समजेल?

जेव्हा तुम्ही सतत एखाद्याला कॉल किंवा मेसेज करण्याचा प्रयत्न करत असता आणि तुम्हाला प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या ब्लॉक लिस्टमध्ये असू शकता. पण जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल करत आहात तो तुमचा खास मित्र किंवा जवळचा नातेवाईक आहे आणि तो तुम्हाला ब्लॉक करू शकत नाही, तर आता तुम्ही सहज शोधू शकता की त्याने तुम्हाला ब्लॉक केले आहे की नाही.

हे वाचा : 5G लाँचनंतर 10-12 हजारांचे स्वस्त मोबाईल बंद होतील? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

समोरील व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे की नाही हे शोधण्याचा खात्रीशीर मार्ग नसला तरी, तुम्हाला ब्लॉक केले आहे की नाही हे सांगणारी एक सोपी युक्ती आहे.

तुम्हाला कोणी ब्लॉक केले आहे हे कसे कळेल?

Step1- तुमच्या फोनचा डायलर उघडा आणि त्या व्यक्तीला कॉल करण्याचा प्रयत्न करा.

Step 2- जर तुम्हाला एखादी रिंग ऐकू आली आणि त्यानंतर ती व्यक्ती 'व्यस्त' आहे असे सांगितले जात असेल, तर याचा अर्थ तुम्हाला ब्लॉक केलेलं असावं.

परंतू तुम्ही खरंच ब्लॉक केले गेले आहात का? हे कन्फर्म करण्यासाठी त्या व्यक्तीला 2-4 वेळा कॉल करण्याचा प्रयत्न करा. कधीकधी नेटवर्कमुळे देखील असं होऊ शकतं किंवा खरोखर त्या व्यक्तीने एक रिंगमध्ये तुमचा फोन कट केला असावा.

हे वाचा : ऑनलाईन शॉपिंग करतना कधीही होणार नाही फसवणूक, कंपनीकडून ग्राहकांसाठी नवीन सुविधा बाजारात

Step 3- तसेच त्या व्यक्तीला तुम्ही मेसेज करुन देखील पाहू शकता. जर त्या व्यक्तीचा त्यावर कोणताही मेसेज किंवा रिप्लाय आला नाही तर समजा की समोरील व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं आहे.

कृपया लक्षात घ्या की ही फक्त एक शक्यता आहे आणि वरील दिलेल्या स्टेप्समुळे तुम्ही संभाव्यता ओळखू शकता. परंतू खरंच समोरील व्यक्तीने ब्लॉक केलं आहे का हे ओळखू शकत नाही.

First published:

Tags: Smartphone, Tech news, Truecaller