जाहिरात
मराठी बातम्या / Viral / व्हिडिओ शूट करत होता व्यक्ती; इतक्यात चक्रीवादळानं पूर्ण घरच झालं उद्धवस्त, धडकी भरवणारा VIDEO

व्हिडिओ शूट करत होता व्यक्ती; इतक्यात चक्रीवादळानं पूर्ण घरच झालं उद्धवस्त, धडकी भरवणारा VIDEO

व्हिडिओ शूट करत होता व्यक्ती; इतक्यात चक्रीवादळानं पूर्ण घरच झालं उद्धवस्त, धडकी भरवणारा VIDEO

अमेरिकेतील (America) न्यू जर्सी येथून एक व्हिडिओ (Cyclone Video) समोर आला आहे. यामध्ये वारा इतका जोरदार वाहिला की संपूर्ण घरच काही मिनिटात नाहीसं झालं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 10 सप्टेंबर : चक्रीवादळाबद्दल (Cyclone) प्रत्येकाला चांगलंच माहिती असेल. हे असंच वादळ असतं ज्यामध्ये खूप जोरदार वारे सर्वकाही उडवून नेतात आणि उद्धवस्त करतात. खरं तर, जेव्हाही वादळ येतं तेव्हा वारे इतक्या वेगाने फिरतात की जे काही समोर येतं ते त्याचा नाश करतात. अमेरिकेतील (America) न्यू जर्सी येथून एक व्हिडिओ (Cyclone Video) समोर आला आहे. यामध्ये वारा इतका जोरदार वाहिला की संपूर्ण घरच काही मिनिटात नाहीसं झालं. गेल्या आठवड्यात चक्रीवादळ इडामुळे वारा अनेक ठिकाणी इतका जोरदार होता की तिथली प्रत्येक गोष्ट उद्धवस्त झाल्यासारखी दिसत होती. 1 हजार वर्षापासून जमिनीखाली गाडलं गेलेलं ते रहस्य; रेल्वे रुळामुळं मोठा खुलासा आता जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे या व्हिडिओमध्ये दिसतं, की मार्क त्याच्या कुटुंबासह तळघरात जातो. पण जेव्हा तो तिथून बाहेर येतो आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी समोर पाहतो, तेव्हा तिथे असलेलं घर गायब होतं. हे अतिशय भीतीदायक दृश्य होतं. इडा वादळामुळे या भागात सुमारे 25 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक लोकांच्या गाड्या वाहून गेल्या आहेत. तर पुरामुळे लोकांचे जनजीवनही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे.

10 वर्षांच्या मुलीचा IQ आईनस्टाईनपेक्षाही जास्त, मंगळावर कॉलनी वसवण्याचं स्वप्न! 3 मिनिटांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. बातमी देईपर्यंत 1 मिलियनहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. मार्क कोबिलिंस्की नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ शेअर होताच लोक हैराण झाले. व्हिडिओ पाहिल्यानंतर, एका वापरकर्त्याने सांगितलं की प्रत्यक्षात हा वारा इतका धोकादायक असू शकतो याची मला अजिबात कल्पना नव्हती. दुसर्‍या वापरकर्त्याने सांगितलं की व्हिडिओमध्ये जे काही दिसत आहे ते खरोखरच भीतीदायक आहे. याशिवाय इतर अनेक लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात