नवी दिल्ली 16 नोव्हेंबर : दुर्घटना कधीही आणि कोणासोबतही घडू शकते. याचा वेळ काळ निश्चित नसतो. काही दुर्घटना अतिशय भयानक असतात (Horrific Incident). यात लोकांचा जीवही जातो. तर काही घटनांमध्ये लोक मृत्यूच्या दारातून परत येतात. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) झाला आहे. यात एक व्यक्ती किचनमध्ये (Kitchen video) जेवण बनवताना दिसतो. मात्र, यादरम्यानच त्याच्यासोबत अशी घटना घडते ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल.
धोकादायक रस्ता आणि शेजारीच खोल दरी; इतक्यात घसरली दुचाकी अन्..., Shocking Video
दुर्घटनेचा हा व्हिडिओ किचनमधील आहे. हा व्हिडिओ घरातील आहे की रेस्टॉरंटमधील हे समजू शकलेलं नाही. फेसबुकवर हा व्हिडिओ नितेश वर्मा नावाच्या व्यक्तीनं शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती किचनमध्ये काम करताना दिसतो. हा व्यक्ती एका भांड्यात चिकन करी बनवताना दिसतो. यानंतर करी तयार होताच तो कपड्याने हे भांडं उचलून दुसरीकडे घेऊन जाऊ लागतो.
याचदरम्यान एक भयंकर घटना घडते. चिकन करीचं हे भांडं दुसरीकडे घेऊन जात असतानाच या व्यक्तीचा तोल जातो आणि हातातील गरम चिकन करी असलेलं हे भांडं खाली पडतं. यानंतर उकळलेली गरम चिकन करी या व्यक्तीच्या पायावर पडते. सुदैवाने या घटनेत हा व्यक्ती जास्त जखमी झाला नाही. या घटनेनंतर या व्यक्तीला नेमकी किती दुखापत झाली याची माहिती समोर आलेली नाही.
शहीद कर्नल विप्लव यांच्या मुलाचा तो VIDEO; अबीरला सैनिक करण्याचं स्वप्न अधुरच
हा व्हिडिओ सोशल मीडियावर लाखो लोकांनी पाहिला आहे. लोक या भयानक व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट करत आहेत. लोकांनी या दुर्घटनेनंतर या व्यक्तीबद्दलही चौकशी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral