Manipur Attack : मणिपूरमधील (Manipur News) अतिरेकी हल्ल्यात शहीद कर्नल विप्लव त्रिपाठी, त्यांची पत्नी अनुजा आणि पूत्र अबीर यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी 12.30 वाजता भारतीय वायू-सेनाचं विशेष विमान AN-32 पासून रायडगड स्थित जिंदल हेलीपॅड पोहोचविण्यात आलं. येथून त्यांना निवासस्थानी नेण्यात आलं. येथे त्यांच्यावर राजकीय सन्मानासह अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान एक व्हिडीओ (Video Viral On Social Media) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी तरळेल. हा व्हिडीओ शहीद कर्नल विप्लव त्रिपाठी यांचा मुलगा अबीर याचा आहे. आपला मुलगा सैन्यात जावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती. म्हणूनच कदाचित लहापणापासून त्यांनी मुलाला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती.
हे ही वाचा-मणिपूरमध्ये अतिरेकी हल्ला, रायफल अधिकाऱ्याच्या पत्नी आणि मुलासह 7 जवान शहीद
या प्रशिक्षणाचा हा व्हिडीओ आहे. मात्र अतिरेकी हल्ल्यामुळे या सैनिक होण्याचं या चिमुरड्याचं स्वप्न भंगलं. अतिरेकी हल्ल्यात अख्खं कुटुंब शहीद झालं. या घटनेमुळे देशातील प्रत्येक नागरिकाने हळहळ व्यक्त केली आहे.
ये वीडियो शहीद कर्नल विप्लव के बेटे अबीर का है।कर्नल 2 भाई थे।दोनों सेना में थे।विप्लव बड़े थे जबकि छोटे भाई अनय त्रिपाठी भी सेना में अफसर हैं।वीडियो को देखकर ऐसा लगता है की विप्लव अबीर को भी सेना में भर्ती करवाना चाहते थे।लेकिन अफसोस हमले में प्यारे अबीर की भी मौत हो गई। pic.twitter.com/LEV3x9oqVg
— Gyanendra Tiwari (ABP News) (@gyanendrat1) November 15, 2021
शहीद कर्नल यांच्या कुटुंबावर अंत्यसंस्कार केल्यानंतर शहरातील व्यापाऱ्यांनी शोक व्यक्त करीत दुकानं बंद ठेवली. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून शहरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू होते.
शनिवारी सकाळी 11 वाजता चुराचंदपूरमधील सिन घाट सब डिविजनमध्ये हा अतिरेकी हल्ला झाला होता. यावेळी 46 आसाम रायफल्सचे कमांडिंग अधिकारी कर्नल विप्लव यांच्या तीन गाड्यांच्या ताफा निरीक्षण करून परतत होता. अतिरेकी येथे हत्यारं घेऊन लपून बसले होते. कर्नलच्या ताफ्यातील पहिली गाडी ब्लास्टने उडवण्यात आली. मध्यल्या गाडीत कर्नल आणि त्यांचं कुटुंबीय होतं. अतिरेक्यांनी या गाडीवर गोळीबार सुरू केला. यावेळी घटनास्थळी कर्नल विप्लव (40) शहीद झाले. या हल्ल्यात त्यांची पत्नी अनुजा यांचाही मृत्यू झाला. तर मुलगा अबीर (5) गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.