श्रीनगर 16 नोव्हेंबर : बाजूला मोठमोठे डोंगर आणि दऱ्या असताना बाईक रायडिंग (Bike Riding) करण्याची मजा काही औरच आहे. विशेषतः जर हीच रायडिंग लेह-लडाखमध्ये (Bike Riding in Leh Ladakh) करायला मिळाली तर सोन्याहून पिवळं. मात्र अशा ठिकाणी गाडी चालवणं तितकंच अवघडही असतं. इथे एक छोटी चुकही तुमच्यासाठी जीवघेणी ठरू शकते. सोशल मीडियावर बाईक रायडिंगचा एक असाच व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bike Riding) होत आहे. यात दिसतं की दुचाकीस्वार युवक एका मोठ्या दुर्घटनेतून अगदी थोडक्यात वाचतो.
शहीद कर्नल विप्लव यांच्या मुलाचा तो VIDEO; अबीरला सैनिक करण्याचं स्वप्न अधुरच
श्रीनगरच्या लडाखच्या रस्त्यावरील जोजिला पास येथून दोन दुचाकीस्वार युवक चिखल असलेल्या रस्त्यावरुन डोंगरांच्या मधून प्रवास करत होते. त्यांच्या दुचाकींसमोरच लोखंडाच्या पाईपनं भरलेला एक ट्रक जात होता. याचवेळी ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात यातील एका दुचाकीस्वाराचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी घसरली (Accident During Bike Riding). मात्र सतर्कता दाखवत त्यानं लगेचच स्वतःला सावरलं.
हैराण करणारी बाब म्हणजे जिथून ही दुचाकी घसरली त्यापासून अवघ्या दोन पावलाच्या अंतरावरच खोल दरी होती. दुचाकीस्वाराने सतर्कता दाखवत लगेचच स्वतःला सावरलं नसतं तर मोठी दुर्घटना घडली असती. या दुचाकीस्वाराच्या मागे असलेल्या दुसऱ्या दुचाकीस्वाराने घटनेचा व्हिडिओ बनवला आहे.
कारचा दरवाजा उघडला अन् दुचाकीस्वार खाली पडला, टेम्पोने रामला चिरडले, LIVE VIDEO
श्रीनगर घाटी आणि लडाखच्या मध्ये जोजिला पास हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. हा रस्ता जगातील सर्वात घातक डोंगराळ रस्ता म्हणून ओळखला जातो. हा व्हिडिओ भूपेंद्र जाट नावाच्या एका युवकानं शेअर केला आहे. व्हिडिओ मागील महिन्यातील आहे. मात्र, यूट्यूबवर तो रविवारी शेअर केला गेला. हा व्हिडिओ आतापर्यंत 7 हजारहून अधिकांनी पाहिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bike accident, Bike riding