जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आकाशात जाताच Hot Air Balloon पेटला; आगीचा विळखा वाढला अन् प्रवासी...; भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO

आकाशात जाताच Hot Air Balloon पेटला; आगीचा विळखा वाढला अन् प्रवासी...; भयंकर दुर्घटनेचा LIVE VIDEO

हॉट एअर बलूनला आग

हॉट एअर बलूनला आग

आकाशात जाताच हॉट एअर बलूनला आग लागली, या भयंकर दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 02 मार्च :  आकाशात उंच उडायला कुणाला आवडणार नाही. माणसांना पक्ष्यांसारखे आकाशात उडण्यासाठी पंख नसले तरी बरीच साधनं आहेत, ज्यातून माणूस आकाशात उडण्याचा अनुभव घेतो. त्यापैकीच एक म्हणजे हॉट एअर बलून. अशाच एका हॉट एअर बलूनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आकाशात जाताच हॉट एअर बलूनला आग लागली आहे. अमेरिकेच्या मेक्सिकोतील ही भय़ंकर दुर्घटना आहे. एका हॉट एअर बलूनला आग लागली. आकाशात जात अचानक बलून पेटला. बलूनमध्ये प्रवासी होते. ते जीव मुठीत धरून होते.  हळूहळू आगीने बलूनला विळखा घातला. आता प्रवाशांना काहीही करून जीव वाचवायचा होता. आगीतून फुफाट्यात अशी त्यांची अवस्था झाली होती. तरी त्यांनी मृत्यूपासून वाचण्यासाठी मृत्यूच्याच दारात स्वतःला झोकून देण्याचा धोका पत्करला.

News18लोकमत
News18लोकमत

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. कसं शक्य आहे? मगरीच्या पोटातून जसाच्या तसा जिवंत बाहेर आला माणूस; आजवर कधीच पाहिला नसेल असा VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा फुगा हवेत उडतो आहे. फुग्याच्या तळाशी असलेल्या बास्केटमध्ये अचानक आग लागली. या दरम्यान, वारा वाहू लागताच, वेगाने वाढणारी आग पेटू लागते. यादरम्यान प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली असून, स्वत:ला वाचवण्यासाठी प्रवासी खाली उडी मारतात. माहितीनुसार, मेक्सिको सिटीजवळील प्रसिद्ध टिओतिहुआकान  स्थळावरील ही घटना आहे. टिओतिहुआकन हे सूर्य आणि चंद्राचे पिरॅमिड आणि त्याचा अव्हेन्यू ऑफ द डेड असलेले एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. Video : अपघात कसा झाला? टेम्पो पलटी झाल्यावर ड्रायव्हरनेच लावला डोक्याला हात या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यात एक पुरुष आणि एक महिला आहे.  तर एका मुलाचा चेहरा पूर्णपणे भाजल्याचं सांगितलं जातं आहे.

जाहिरात

@Lerpc75 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या एक मिनिटाचा हा व्हिडीओ आहे. जो पाहून सर्वांना धडकी भरली आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात