मराठी बातम्या /बातम्या /Viral /अनोळखी व्यक्तीसोबत गेली ‘रोमँटिक हॉलिडे’ला, परतल्यावर बसला 440 व्होल्टचा झटका!

अनोळखी व्यक्तीसोबत गेली ‘रोमँटिक हॉलिडे’ला, परतल्यावर बसला 440 व्होल्टचा झटका!

त्याची तिच्याशी फक्त ऑनलाईन ओळख होती, तरीही ती सोबत हॉलिडे साजरा करायला गेली. पुढे काय झालं, याचा अनुभव तरुणीनं सर्वांसोबत शेअर केला आहे.

त्याची तिच्याशी फक्त ऑनलाईन ओळख होती, तरीही ती सोबत हॉलिडे साजरा करायला गेली. पुढे काय झालं, याचा अनुभव तरुणीनं सर्वांसोबत शेअर केला आहे.

त्याची तिच्याशी फक्त ऑनलाईन ओळख होती, तरीही ती सोबत हॉलिडे साजरा करायला गेली. पुढे काय झालं, याचा अनुभव तरुणीनं सर्वांसोबत शेअर केला आहे.

न्यूयॉर्क, 13 डिसेंबर: ऑनलाईन डेटिंग ऍपवर (Online dating app) ओळख झालेल्या व्यक्तीसोबत रोमँटिक हॉलिडे (Romantic holiday) साजरे करायला जाऊन (Experience) आल्यावर नेमकं काय घडलं, याचा अनुभव एका तरुणीने शेअर केला आहे. प्रत्यक्ष ओळख नसताना केवळ ऑनलाईन ओळखीच्या (online introduction) जोरावर तिने त्या तरुणासोबत सुट्टी साजरी करण्याचा निर्णय घेतला. आजकाल अनेकांची ऑनलाईन चॅटिंग साईटवर ओळख होते आणि त्यानंतर काही दिवसांतच ते एकमेकांचे मित्र होतात. त्यातील काही जणांची मैत्री ही दीर्घकाळ टिकते, तर काहीजणांची घोर फसवणूक आणि निराशादेखील होऊ शकते. मात्र टिकटॉकवर तरुणीनं शेअर केलेला अनुभव या दोन्हीपेक्षा वेगळाच होता.

दिली ट्रिपवर येण्याची ऑफर

टिकटॉकर एबीनं आपला अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी टिंडर डेटिंग ऍपवर तिची ओळख एका तरुणासोबत झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी तरुणाने तिला रोमँटिक हॉलिडेसाठी येण्याची विनंती केली. मात्र प्रत्यक्षात कधीही भेट झालेली नसताना हॉलिडे साजरा करायला कसं जावं, असा प्रश्न तरुणीला पडला होता. मात्र तरुणाने तिला वारंवार विनंती केली आणि सुट्टीवर सोबत येण्यासाठी तयार केलं.

तरुणीने आपला रोमँटिक फोटोदेखील शेअर केला आहे.

एन्जॉय केले हॉलिडे

आपल्या मित्रासोबत घालवलेला रोमँटिक वेळ आणि सुट्टी आपल्यासाठी अविस्मरणीय होती, असा अनुभव तरुणीने शेअर केला आहे. आपली एकमेकांशी फारच जुनी ओळख आहे, असं या काळात वाटत होतं आणि पुढेही आयुष्यभर आपण एकमेकांचे सोबती म्हणून राहू, असा विश्वास या तरुणीला वाटू लागला होता. त्यांनी अनेक ठिकाणांना भेटी दिल्या आणि रोमँटिक क्षण एकत्र साजरे केले. मात्र जेव्हा ही ट्रिप संपली तेव्हा गणित बदललं.

तरुणानं दिला धक्का

ट्रिपवरून परत आल्यानंतर मात्र तरुणाने तरुणीला मोठा धक्का दिला. तुझ्यासोबत घालवलेला वेळ हा चांगला आणि अविस्मरणीय अनुभव होता, मात्र यापुढे आपल्याला रोमँटिक नातं ठेवण्यात रस नसल्याचं तरुणानं सांगितलं. त्यामुळे तरुणीला जबर धक्का बसला. असं असलं तरी आम्ही अजूनही एकमेकांच्या संपर्कात असून चांगले मित्र आहोत, असंही तिनं म्हटलं आहे.

हे वाचा- Big News: टिफिन बॉम्बचा जोरदार स्फोट, खेळता खेळता चिमुकल्याचा मृत्यू

युजर्सनी टोचले कान

या अनुभवाबाबत युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनोळखी व्यक्तीसोबत हॉलिडेला गेल्याबद्दल अनेकांनी तिला सुनावलं आहे. तर नशीब, तुझा एखादा अवयव त्याने काढून नेला नाही, असं सुनावत तिला काहींनी टोमणेही मारले आहेत.

First published:

Tags: Boyfriend, Girlfriend, Romance, Tik tok, USA