मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

बापरे बाप! टॉयलेट सीटवर बसताच कमोडमधून बाहेर आला 5 फूट साप आणि...

बापरे बाप! टॉयलेट सीटवर बसताच कमोडमधून बाहेर आला 5 फूट साप आणि...

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

दिवसाची सुरुवात इतकी भयानक होईल, हे या व्यक्तीने स्वप्नातही पाहिलं नसेल.

  • Published by:  Priya Lad

ऑस्ट्रिया, 13 डिसेंबर : दिवस उजाडला की आजचा दिवस आपला चांगला जावो अशीच आशा करतो. पण ऑस्ट्रियातील एका व्यक्तीसाठी दिवसाची सुरुवातच इतकी भयानक होईल, हे त्याने स्वप्नातही पाहिलं नसेल. त्या व्यक्तीच्या टॉयलेटमध्ये  (Snake In toilet) एक भलामोठा साप लपून बसला होता. ही व्यक्ती सकाळी सकाळी शौचसाठी म्हणून टॉयलेट सीटवर बसली आणि तो साप कमोडमधून बाहेर आला. यानंतर जे घडलं ते हादरवणारं होतं (Snake bites on private part).

65 वर्षांच्या या व्यक्तीवर टॉयलेटमध्ये सापाने हल्ला केला आहे. ही व्यक्ती शौचासाठी टॉयलेट सीटवर बसताच तिच्या गुप्तांगाला सापाने दंश केला.  त्यानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात भरती करावं लागलं.स्टायरिया स्टेट पोलिसांच्या माहितीनसुरा ग्राज सिटीतील हे प्रकरण आहे.

ही व्यक्ती सकाळी उठून टॉयलेटला गेली. टॉयलेटवर बसताच काही सेकंदातच प्रायव्हेट पार्टला काहीतरी टोचल्यासारखं वाटलं. तो सीटवरून उठला आणि त्याने पाहिलं तर त्याला मोठा शॉक बसला. कारण त्याच्या प्रायव्हेट पार्टला चक्क एक साप चावला होता. तब्बल पाच फूट लांबीचा हा साप होता.  त्यानंतर त्या व्यक्तीला तात्काळ अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात पाठवण्यात आलं. त्याच्यावर उपचार झाल्यानंतर त्याची प्रकृती आता ठिक असल्याचं सांगितलं जातं आहे.

हे वाचा - या शिक्षकाने तब्बल 1000 कोळी घरात पाळले, कारण जाणून तुम्हाला पण येईल रडू

झी न्यूजने WION रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार त्या व्यक्तीला टॉयलेटमध्ये साप चावल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर त्याच्या शेजारील एका घराकडे संशयाची सुई वळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीच्या शेजारी एक 24 वर्षांचा तरुण राहतो. ज्याच्या घरात  11  साप आणि अजगर आहेत. हे सर्व साप बिन विषारी आहेत. पण तरी त्याच्या बेजबाबदारपणामुळे दुसऱ्याला शारीरिक नुकसान झाल्याच्या आरोपात त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे वाचा - मध्यरात्री टॉयलेटमधून अचानक येऊ लागला फ्लशचा आवाज; दरवाजा उघडताच त्याला फुटला घाम

याआधी थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही एका घराच्या शौचालयात एक भला मोठा अजगर अचानक आला आणि त्याने एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला होता. टेर्डसाक असं या व्यक्तीचं नाव. टेर्डसाक हे फ्रेश होण्यासाठी गेले आणि ते कमोडवर बसले. तितक्यात अजगराने त्यांच्या प्रायव्हेट पार्टला धरलं. टेर्डसाक यांनी मोठ्याने आरडाओरड केली आणि स्वत:च त्या सापाला बाजूला फेकून दिलं. तब्बल 10 फुटांचा हा लांब अजगर होता.

First published:

Tags: Snake, Viral, Wild animal