नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : भारतासह जगभरात रस्ते अपघातात (Road Accident) सर्वाधिक मृत्यू होतात. कधी दुसऱ्याच्या चुकीमुळे, तर कधी आपल्याच बेजबाबदारपणामुळे अपघात होतात. सोशल मीडियावर रस्ते, रेल्वे, विमान अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. असाच एक रस्ते अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही गाडी सावधपणे चालवण्यासह हेल्मेट घालणंही कधी विसरणार नाही. उत्तर प्रदेश पोलीस सचिन कौशिक यांनी एक रस्ते अपघाताचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओमध्ये टू-व्हिलर चालवणाऱ्या एका तरुणीसोबत झालेला अपघात पाहून तुम्हीही हैराण व्हाल. व्हिडीओमध्ये तरुणी स्कूटी चालवताना दिसतेय. त्याचवेळी तिच्या स्कूटीसमोर अचानक एक कार टर्न घेते. त्यामुळे तरुणीची त्या कारला टक्कर होते आणि ती खाली कोसळते. ही टक्कर इतकी भयंकर आहे, की स्कूटीच्या टायरचे प्लेट्सदेखील निघतात. ती तरुणीही स्कूटीवरुन खाली आदळते. अपघाताचा हा व्हिडीओ CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
VIDEO : आणखी एका महिलेचा प्रताप; कार चालकाला 9 वेळा चापट मारत बॅटनं धुतलं
तरुणीची स्कूटी वेगात असतानाच कारशी भयंकर टक्कर होते. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे तरुणीने हेल्मेट घातलं असल्याने तिचा जीव अगदी थोडक्यात बचावतो. तिने हेल्मेट घातलं नसतं, तर इतक्या स्पीडमध्ये आदळल्याने तिच्या डोक्याला जबर मार लागू शकत होता. सचिन कौशिक यांनी हा व्हिडीओ शेअर करत, केवळ 900 रुपयांत काही मिळो अथवा न मिळो, परंतु आयुष्य जरुर मिळतं, असं कॅप्शन दिलं आहे.
मात्र 900 रुपए में कुछ मिले ना मिले, ‘जीवन’ ज़रूर मिलता है।#WearHelmet #HelmetSavesLife #Accident
— SACHIN KAUSHIK (@upcopsachin) August 6, 2021
pic.twitter.com/VCypokvs4M
Bike वर मागे बसणाऱ्यांसाठी सरकारचा नवा नियम, असा करावा लागणार टू-व्हिलरवर प्रवास
अनेक लोक हा व्हिडीओ पाहून विविध कमेंट देत असून केवळ एका हेल्मेटमुळे तिचा जीव वाचू शकल्याची प्रतिक्रियाही देत आहेत. या व्हिडीओमुळे अनेकांना हेल्मेटची गरज, त्याची जीवाशी असलेली किमत समजली असल्याचंही सांगितलं जात आहे.