मुंबई, 12 मे : तुम्ही कुठेही फिरायला जात, अशावेळी सगळ्यात महत्वाचं असतं ते राहण्याची सोय. ती एकदा चांगली झाली की सगळी काळजी मिटते आणि तुम्ही फिरण्याचा चांगला आनंद घेऊ शकतात. यासाठी मग लोक आपल्या सोयी आणि बजेट प्रमाणे हॉटेल्स किंवा धर्मशाळेचा पर्याय पाहातात आणि राहातात. आता तर रेंटल प्रॉपर्टी आणि होमस्टेचा ट्रेंड आहे. ज्यामुळे राहण्यासाठी खूप चांगले पर्याय उपलब्ध आहेत. होमस्टेचा पर्याय निवडल्यावर, एखादी व्यक्ती भाड्याने आपली मालमत्ता इतरांना राहायला देते. हे हॉटेलपेक्षा स्वस्त असते. पण असं असलं तरी देखील हे किती धोकादायक असू शकते, हे नुकतेच समोर आले आहेत.
भूतामुळे रस्त्यावर गाडीला अपघात? व्हिडीओचं रहस्य अखेर समोर
हल्लीच एका महिलेसोबत विचित्र प्रकार घडला, ज्याबद्दल तिने सोशल मीडियावर देखील आपला एक्पिरिएन्स शेअर केला आहे. 26 वर्षीय केनेडी कॅलवेल ही कोलंबिया येथे 14 मैत्रिणींसह सहलीला गेली, तेव्हा त्यांनी स्टेसाठी घर रेंटल घेतलं, पण तिथे त्यांनी जे पाहिलं त्यानंतर तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
काय सांगता! एका खाटेची किंमत 1 लाख रुपये? नक्की असं काय आहे खास?
आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त मुक्कामाला आलेल्या या ग्रुपमधील एका मुलीला रेंटवर घेतलेल्या घरात विचित्र संशय आला. अशा परिस्थितीत मुलीने टॉर्चच्या सहाय्याने घराचा प्रत्येक कोपरा शोधायला सुरुवात केली. तिने आपल्या मित्रांना देखील याची कल्पना दिली. यानंतर त्यांनी शॉवरहेड, पिक्चर फ्रेमपासून दरवाजाच्या कुलूपांपर्यंत सर्वत्र शोध घेतला, त्यानंतर त्यांनी बाथरूम मधील सॉकेटमध्ये जे पाहिलं त्यानंतर ते थक्क झाले.
प्रतिकात्मक फोटो
खरंतर या बाथरूमच्या प्लग सॉकेटमध्ये एक छोटा कॅमेरा होता. बाथरुममध्ये आंघोळ करत असताना कोणीतरी त्यांचा व्हिडीओ टिपत असल्याचं कळताच घाबरलेल्या मुलींची अवस्था आणखीनच बिकट झाली. केनेडीने सांगितले की, या तपासापूर्वी माझा एक मित्र टिकटॉक व्हिडीओ पाहत होता, ज्यामध्ये हे सांगितले होते की, छुपे कॅमेरे किती लहान असू शकतात. त्यानंतर आम्ही ज्या घरात राहतो त्या घरात देखील आपण तपास करावा असं आम्हाला वाटलं आणि आम्ही जेव्हा हे पाहिलं तेव्हा तर आम्हाला धक्का बसला. केनेडी यांनी सांगितले की, कॅमेरा मिळताच आमची मजेशीर सहल अचानक स्ट्रेसफुल झाली. आम्ही तात्काळ पोलिसांना फोन केल्यावर पोलिसांनी येऊन घराची तपासणी केली. मालमत्तेच्या मालकाचे म्हणणे आहे की, त्यांनी हे कॅमेरे बसवलेले नाहीत. मालकाचे असे म्हणणे आहे की हा कॅमेरा इथे कसा आला हे मला माहीत नाही. कदाचित या आधी आलेल्या कोणीतरी ते बसवलेलं असू शकतं. पोलीस आता या प्रकरणाचा तपास घेत आहेत.