जाहिरात
मराठी बातम्या / Viral / काय सांगता! एका खाटेची किंमत 1 लाख रुपये? नक्की असं काय आहे खास?

काय सांगता! एका खाटेची किंमत 1 लाख रुपये? नक्की असं काय आहे खास?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एक साधी दोरीची खाट नुकतीच 1 लाखांना विकली गेली आहे. लाखोंच्या किंमतीत विकल्या जाणाऱ्या या दोरीच्या खाटमध्ये काय विशेष आहे, असा विचार तुम्हीही करत असाल. चला जाणून घेऊया या छोट्या खाटेची कहाणी.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 मे : कात्याच्या दोरीपासून बनवलेली खाट तर तुम्ही पाहिलीच असेल. एक काळ असा होती की ही खाट जवळ-जवळ सगळ्याच घरात दिसायची. लाकडाचे खांब त्यावर विनलेली दोरी अशी ही खाट अनेकांना त्यांच्या लहानपणाची आठवण करु देईल. दुपारी झाडाच्या सावलीखाली या खाटेवर झोपण्याची मजाच काही और आहे. आज अनेक ढाब्यांवर ही खाट एक डेकॉरेशनचं साधन म्हणून देखील वापली जाते. पण विचार करा की ही खाट विकत घ्यायला गेलात तर तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील? 1 हजार, 2 हजार, 3 हजार… असं तुम्ही म्हणाल पण आम्ही तुम्हाला सांगितलं की या खाटची किंमत 1 लाख रुपये आहे तर? तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, पण हे खरं आहे. एक साधी दोरीची खाट नुकतीच 1 लाखांना विकली गेली आहे. लाखोंच्या किंमतीत विकल्या जाणाऱ्या या दोरीच्या खाटमध्ये काय विशेष आहे, असा विचार तुम्हीही करत असाल. चला जाणून घेऊया या छोट्या खाटेची कहाणी. Ajab Gajab : जगातील अशी बँक जिथे फक्त दोनच कर्मचारी करतात काम Etsy या अमेरिकन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर अनेक देसी खाट उपलब्ध आहेत. या खाटेला वेबसाइटने दिलेले नावही खूप शानदार आहे आणि कदाचित त्यामुळेच त्याची किंमत गगनाला भिडली आहे. वेबसाइटने या देसी कॉटला ‘इंडियन ट्रेडिशनल बेड वेरी ब्यूटीफुल डेकोर’ असे नाव दिले आहे.

News18

तसेच या खाटेची माहिती देताना लिहिले गेले आहे की, ती पूर्णपणे हाताने बनविलेली आहे. ती तयार करण्यासाठी ज्यूट दोरी आणि लाकूड वापरण्यात आले आहे. दुसरीकडे, जर आपण त्याच्या किंमतीबद्दल बोललो तर, या वेबसाइटनुसार, त्याची किंमत 1,12,213 रुपये आहे. या वेबसाइटवर फक्त ही एक खाट नाही तर अशा अनेक देसी खाट आहेत, ज्यांची किंमत 90 हजार, 70 हजार ते लाखांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत, तुम्हालाही प्राचीन खाट खरेदी करायची असेल, तर तुम्ही या वेबसाइटला भेट देऊ शकता. आत्ताच्या दुचाकीमध्ये हेडलाईट्स नेहमीच सुरु का असतात, कधी असा प्रश्न पडलाय? आश्चर्य म्हणजे वरील नमुद केलेल्या गोष्टींपेक्षा वेगळं असं या खाटेचं दुसरं कोणतं वेगळं वैशिष्ट्य नाही. ही भारताची एक परंपरा आहे आणि कालांतराने त्याची जागा पलंगाने घेतली आहे. परंतू आता हा प्रकार लूप्त होत असल्यामुळे ही खाट इतक्या महागड्या किंमतीत विकली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात