जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अपघात तर तुम्ही अनेक पाहिले असणार, पण हा Video मन सुन्न करणार; वरुन दगड आला आणि....

अपघात तर तुम्ही अनेक पाहिले असणार, पण हा Video मन सुन्न करणार; वरुन दगड आला आणि....

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ही घटना जिथे घडली तिथे मागे उभ्या असलेल्या कारच्या कॅमेरात हा संपूर्ण प्रकार कैद झाला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 जुलै : नागालँडमध्ये मंगळवारी संध्याकाळी भूस्खलन झाले यामुळे एका टेकडीवरून मोठमोठे खाली पडू लागले. या प्रकारात एका मोठ्या आणि वेगाने येणाऱ्या दगडामुळे खाली उभ्या असलेल्या दोन कारचा चक्काचुर झाला आहे, यामुळे कारच्या आत असलेल्या लोकांचा देखील मृत्यू झाला आहे. ही घटना दिमापूर आणि कोहिमा दरम्यान चुमुकेदिमा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 29 वर घडली, मुसळधार पावसाच्या दरम्यान संध्याकाळी 5 वाजता झालेल्या अपघातात अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ही घटना जिथे घडली तिथे मागे उभ्या असलेल्या कारच्या कॅमेरात हा संपूर्ण प्रकार कैद झाला. तुम्ही व्हिडीओत पाहू शकता की रस्त्यावर सगळ्याच गाड्या थांबल्या आहेत. तेव्हा उजव्या बाजून वरुन एक मोठा दगड वेगाने येतो आणि थेट पहिल्या कारला जोरदार धडकतो. त्यानंतर त्याच्या बाजूला असलेल्या कारला देखील धडकतो आणि मग खाली पडतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचेही हृदय हादरेल. Viral Video : ट्रकला ओव्हरटेक करण्याचा कार चालकाचा प्रयत्न, नियंत्रण सुटलं आणि… या प्रकरणात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती पीटीआयने दिली. अहवालात पोलिसांच्या हवाल्याने दावा करण्यात आला आहे की कारमध्ये आणखी एक व्यक्ती अडकली आहे आणि बचाव कार्य सुरू आहे.

जाहिरात

मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी ट्विटमध्ये मृतांबद्दल शोक व्यक्त केला आणि सांगितले की, ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण “पाकाला पहाड” म्हणून ओळखले जाते आणि ते भूस्खलन आणि दगड कोसळण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. तरुणाचं भलतच धाडस, कॉस्ट्यूम घालून पोहोचला खऱ्या मगरीजवळ छेड काढताच… संपूर्ण प्रकार व्हिडीओत कैद ते म्हणाले, “आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दिमापूर ते कोहिमा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर दगड पडल्याने मोठे नुकसान झाले, त्यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले. हे ठिकाण नेहमीच “पाकाळा पहाड” म्हणून ओळखले जाईल. हे भूस्खलन आणि खडक कोसळण्यासाठी ओळखले जाते.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात