मुंबई 28 जून : निसर्ग अनेक आश्चर्यांनी भरलेला आहे, हे अगदी खरं आहे. निसर्गात अनेकदा काही अशा विचित्र गोष्टी पाहायला मिळतात, ज्या खरोखर आश्चर्यकारक असतात. हा खरोखरच चमत्कार आहे की काय, असा प्रश्न पडतो. असाच एक व्हिडिओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ एका माकडाचा आहे, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे माकड सामान्य माकड नाही. खरं तर तुम्ही याआधी असं माकड कधीच पाहिलं नसेल. कारण या माकडाला शेपूट नाही आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे माकड माणसांप्रमाणंच फिरतं. माकडाची ही प्रजाती अतिशय कमी प्रमाणात पाहायला मिळते. Viral : किंग कोब्राचं ऑपरेशन, पोटातून जे निघालं ते धक्कादायक हा व्हिडिओ भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी प्रवीण कासवान यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक काळं माकड दाखवण्यात आलं आहे, जे माणसांप्रमाणे चालतं. विशेष म्हणजे त्याला शेपूट नसतं, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे माकड झाडांवर उडी मारण्यासाठी हातांचा वापर करतं. हात वापरून उडी मारताना ते स्वतःवर नियंत्रण ठेवतं. मात्र कधी उडी मारताना संतुलन बिघडलं तर ते आपल्या हाताने झाडाची फांदी पकडतं आणि स्वतःला पडण्यापासून वाचवतं. मात्र या माकडाला शेपटी नसते.
The rare video of Hoolock Gibbon (Hoolock hoolock, a primate from the gibbon family, Hylobatidae) - India's only Ape, walking like a human from Kaziranga National Park, Assam. Educational video. pic.twitter.com/qi6X6YH2QP
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) June 27, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ आसाममधील काजीरंगा राष्ट्रीय उद्यानातील आहे. या ठिकाणी एक अत्यंत दुर्मिळ माकड दिसलं, ज्याला हुलॉक गिब्बन म्हणून ओळखलं जातं. या माकडाचा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून सर्वांनीच यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण असं माकड पाहण्याची संधी फार कमी मिळते. त्याची चाल काहीशी गोरिल्लासारखी आहे, जी खूपच आश्चर्यकारक आहे. मात्र, त्याचा आकार माकडांपेक्षा लहान आहे.