मुंबई, 12 नोव्हेंबर : आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञान आपल्या सभोवती असते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण पूर्णपणे विज्ञानाने वेढलेले असतो. अनेक वेळा लोक त्याकडे लक्षही देत नाहीत. अशा लोकांना विज्ञानाच्या जवळ आणण्यासाठी अनेक लोक अनोखे प्रयोग करतात, ज्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोन लोक वितळलेल्या लोखंडाला चेंडूसारखे मारताना दिसत आहेत.
लोखंड वितळण्यासाठी 1500 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आवश्यक आहे. जेव्हा ते वितळते तेव्हा ते लाल, रबरासारखे बनते. अनेक कारखान्यांमध्ये लोखंड वितळवून वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या जातात (Molten iron experiment video). मात्र या वितळलेल्या लोखंडासोबत कोणाला क्रिकेट खेळताना तुम्ही कधी पाहिले आहे का? मग हा व्हिडीओ नक्की पाहा.
अशी दिसत होती जगातील पहिली प्रेग्नंट 'ममी'; 2 हजार वर्षांपूर्वी झाला होता मृत्यू
वितळलेल्या लोखंडाचा पाऊस
सध्या ट्विटर अकाउंट @fasc1nate चा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन लोक वितळलेल्या लोखंडासह क्रिकेट खेळताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दोघांनी अग्निरोधक कपडे घातले आहेत. त्यापैकी एका व्यक्तीच्या हातात एक कंटेनर आहे ज्यामध्ये पाण्यासारखे वितळलेले लोखंड आहे, जे खूप लाल आणि उकळलेले दिसते. समोरच्या व्यक्तीच्या हातात फावडे आहे.
जेव्हा एका व्यक्तीने वितळलेले लोखंड हवेत फेकले तेव्हा ते पाण्यासारखे वर येते. त्यानंतर अचानक दुसरा एक व्यक्ती फावड्याचा बॅट म्हणून वापर करून वितळलेल्या लोखंडावर मारतो. हे करताना लोखंड हवेत अशा प्रकारे पसरते की, हवेत गेल्यावर ते वितळलेले लोखंड एखाद्या फटाक्यातील रॉकेटप्रमाणे चमकते. लोखंडाची आतिषबाजी दिसते.
Launching molten iron in the air with a shovel.pic.twitter.com/C4OHxFFUG0
— Fascinating (@fasc1nate) November 11, 2022
व्हिडिओ वेगाने होत आहे व्हायरल
या व्हिडिओला 12 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, 'हा मूर्खपणाचा प्रयोग आहे.' तर दुसऱ्या युजरच्या मते, 'त्या दोघांनी सुरक्षित कपडे घातले होते, पण प्रयोगाला उपस्थित असलेल्या इतर लोकांनी ते कपडे घातले नसते तर त्यांचा मृत्यू झाला असता.'
आश्चर्य! हाडामांसाऐवजी चक्क 'प्लॅस्टिकचं बाळ'; महिलेच्या डिलीव्हरीनंतर डॉक्टरही शॉक
आणखी एक युजर म्हणाला, 'ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर पडल्यासारखे दिसते.' या व्हिडिओमध्ये वितळलेल्या लोखंडाची आतिषबाजी काही युजर्सना सुंदर वाटतेय तर काहींना हे दृश्य अविस्मरणीय वाटत आहे. या व्हिडिओवर आणखी कमेंट्स येत असून हा वेगाने व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Science, Viral, Viral video.