1826 साली शास्त्रज्ञांना इजिप्तमध्ये एक प्रेग्नंट ममी सापडली. त्यानंतर तिला इजिप्तहून पोलंडच्या वारसॉमध्ये नेण्यात आलं. (प्रतीकात्मक फोटो/सौजन्य - Canva)
तिचा अभ्यास करण्यात आला तेव्हा तिच्या पोटात भ्रूण असल्याचं दिसलं. गरोदरपणाच्या 28 व्या आठवड्यात तिचा मृत्यू झाला, त्यावेळी तिचं वय 20 ते 30 वर्षे होतं, असं मानलं जातं आहे.
फॉरेन्सिक शास्त्रज्ञांनी 2डी आणि 3डी तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील या पहिल्या प्रेग्नंट ममीचा चेहरा समोर आणला आहे.
फॉरेन्सिक शास्त्रज्ञ आणि वारसॉ ममी प्रोजेक्टचे सदस्य चँटल मिलानी म्हणाले, आपली हाडं आणि कवटी, मुख्यतः कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्याबाबत खूप माहिती देतात.
पण ही महिला अशीच दिसत असावी, हे आपण ठोसपणे सांगू शकत नाही, असंही मिलानी यांनी स्पष्ट केलं आहे. (फोटो सौजन्य - Warsaw Mummy Project Human/facebook)