मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आश्चर्य! हाडामांसाऐवजी चक्क 'प्लॅस्टिकचं बाळ'; महिलेच्या डिलीव्हरीनंतर डॉक्टरही शॉक

आश्चर्य! हाडामांसाऐवजी चक्क 'प्लॅस्टिकचं बाळ'; महिलेच्या डिलीव्हरीनंतर डॉक्टरही शॉक

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रेग्नंट महिलेने डिलीव्हरीनंतर जशा बाळाला जन्म दिला त्याला पाहून तिचं कुटुंबच नव्हे तर डॉक्टरांनाही धक्का बसला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India
  • Published by:  Priya Lad

लखनऊ, 11 नोव्हेंबर : तुम्ही बऱ्याच विचित्र प्रेग्नन्सीबाबत ऐकलं असेल. कुणी जुळ्या, कुणी तिळ्या तर कुणी पाच बाळांनाही जन्म दिला आहे. चार हात आणि चार पाय, एकमेकांना डोक्याने किंवा छातीने जोडलेली असलेली सयामी जुळी अशा प्रकरणांबाबत तुम्हाला माहिती असेल. पण कधी कुणी प्लॅस्टिक बाळाला जन्म दिल्याचं ऐकलं आहे का? उत्तर प्रदेशमधील ही धक्कायक घटना आहे.

यूपीच्या इटावामधील हे प्रेग्नन्सीचं विचित्र प्रकरण. एका महिलेने चक्क प्लॅस्टिक बेबीला जन्म दिला आहे. प्लॅस्टिकसारख्या दिसणाऱ्या या बाळाला पाहून डॉक्टरही शॉक झाले. पण नंतर त्यांना यामागील धक्कादायक कारण समजलं.

40 वर्षांच्या या महिलेच्या लग्नाला 18 वर्षे झालीत. पण तिला मूल होत नव्हतं. लग्नाच्या इतक्या वर्षांनी एकही मूल होत नसल्याने तिचे कुटुंब आणि नातेवाईक तिला टोमणे मारायचे. या टोमण्यांना ती वैतागली होती. अखेर ती गरोदर झाली पण...

हे वाचा - धक्कादायक! सोफ्याने घेतला 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव; नेमकं काय घडलं पाहा

सर्वांना आपल्या प्रेग्नन्सीची न्यूज दिल्यानंतर ती गर्भावस्थेच्या या कालावधीत तपासणीसाठी किंवा काही उपचारासाठी म्हणून सार्वजनिक आरोग्य केंद्रात जायची. सहाव्या महिन्यांत तिने आपल्या पोटात दुखत असल्याचं कुटुंबाला सांगितलं. तिला रुग्णालयात दाखल केलं. तिने बाळाला जन्म दिला. पण ते बाळ पाहून सर्वजण शॉक झाले. महिलेने आपण सहाव्या महिन्यात बाळाला जन्म दिला असून ते अविकसित असल्याचा दावा केला.

त्यानंतर तिच्या कुटुंबाने सार्वजनिका आरोग्य केंद्रात डॉक्टरांकडून बाळाची तपासणी करून घेतली. तेव्हा धक्कादायक खुलासा झाला. ते बाळ खरं बाळ नव्हतं. म्हणजे ते प्लॅस्टिक बेबीही नव्हे तर ती खेळण्यातील प्लॅस्टिक डॉलच होती. एक्स-रे आणि प्रेग्नन्सीसंबंधित इतर रिपोर्टही पाहण्यात आले तर ते सर्व नकली असल्याचं समजलं.

हे वाचा - प्रेग्न्सीचं एकही लक्षण नाही; वजन कमी होऊन पोटात तीव्र वेदना झाल्या आणि महिलेने अचानक दिला बाळाला जन्म

मीडिया रिपोर्टनुसार वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षित यांनी सांगितलं की, महिला पोटातील संक्रमणाचा उपचार करण्यासाठी आरोग्य केंद्रात यायची. प्रेग्नन्सीच्या तपासण्यांसाठी नाही. तिच्या लग्नाला बराच कालावधी झाला आणि ती प्रेग्नंट होत नव्हती. मूल होत नसल्याने टोमण्यांना वैतागून महिलेने प्रेग्नंट असल्याचं नाटक केलं होतं.

First published:

Tags: Lifestyle, Pregnancy, Pregnant, Pregnant woman, Uttar pradesh, Viral, Viral news