मुंबई, 25 मे : बर्फ आपल्या सर्वांसाठी सामान्य आहे. पाण्याला थंड केल्यानंतर बर्फ बनतं, हे तर सर्वांना माहितीय पण बर्फाबद्दल अशा काही गोष्टी आहेत, ज्याबद्दल अनेकांना आजही माहिती नाही. आपल्याला कोणताही पदार्थ थंड करायचा झाल्यास किंवा दुखापत झाल्यास आपण बर्फ वापरतो. पण विचार करा की जर बर्फच या जगात नसता तर? तसेच या बर्फाचा शोध नक्की लावला कोणी? बर्फाबद्दल काही मनोरंजक तथ्य समोर आले आहेत, चला याबद्दल जाणून घेऊ. 1835 मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ एड्रियन जीन-पियरे थिलोरियर यांनी बर्फाचा शोध लावला होता असे म्हटले जाते. यासाठी त्यांनी काचेच्या भांड्यात Co2 म्हणजेच द्रव कार्बन डायऑक्साइड टाकला होता. बाष्पीभवन झाल्यानंतर, पात्रात फक्त कोरडा बर्फ शिल्लक होता. खरं तर, जेव्हा कार्बन डाय ऑक्साईड सुपर-कूल्ड अवस्थेत घन बनतो, तेव्हा तो द्रवात मिसळला जातो तेव्हा कोरडा बर्फ तयार होतो. गाडीमधील एक्ट्रा टायरला स्टेपनी का म्हणतात? त्यानंतर 14 जुलै 1850 रोजी प्रथमच मशीनमधून बर्फ गोठवण्यात आला होता, त्या वेळी त्याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले होते. हे यंत्र अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ जॉन गॅरी यांनी तयार केले होते. तापाने त्रस्त लोकांना थंडावा देण्यासाठी डॉक्टर जॉन यांनी या यंत्राचा शोध लावला होता, त्यानंतरच फ्रीजच्या शोधाला गती मिळू शकली, असे सांगितले जाते. आता बर्फाम्हणतोय म्हणून तुम्ही गोंधळून जाऊ नका, आम्ही ज्याबर्फाचा इतिहास सांगतोय, तो ICE आहे, ज्याचा वापर आम्ही ICE क्यूब म्हणून करतो. जर आपण पृथ्वीवर सापडलेल्या नैसर्गिक बर्फाबद्दल बोललो, तर त्याचा इतिहास सुमारे 2.4 अब्ज वर्षांचा आहे. शास्त्रज्ञांनी त्या काळाला ह्युरोनियम हिमयुग असे नाव दिले आहे. जो 2.1 अब्ज वर्षांपूर्वी संपला आहे. ही आहे जगातील 10 सर्वात मोठया शहरांची यादी, मुंबई-दिल्ली कितव्या स्थानावर? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, पण एक काळ असा होता जेव्हा भारत त्याच्या वापरासाठी बर्फ खरेदी करत असे. म्हणजेच त्यावेळी बर्फ तयार करणे भारताला शक्य नव्हते. वास्तविक, जगातील बर्फाचा पहिला व्यवसाय फ्रेडरिक ट्यूडरने सुरु केला होता. त्याला ICE किंग म्हणूनही ओळखले जाते. बर्फाचा शोध लागण्यापूर्वीच ट्यूडरने नैसर्गिक बर्फाची विक्री सुरू केली. त्याचे पहिले बर्फाचे पॅकेज 1806 मध्ये कॅरिबियन देशात पाठवण्यात आले होते, परंतु ते पूर्णपणे अयशस्वी ठरले, कारण तो देश फारच उबदार असल्याने ते वितळले. यानंतर सॅम्युअल ऑस्टिनने टडलरकडून बर्फाचा सर्वात मोठा बॅच विकत घेतला. 1833 मध्ये सॅम्युअल ऑस्टिन बर्फ घेऊन कोलकाता येथे पोहोचला. त्या वेळी 100 टन बर्फ भारतात आणला गेला होता, ज्याचे प्राथमिक खरेदीदार हे ब्रिटिशच होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







