मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पाणघोडा आणि सिंह समोरासमोर भिडले; पाहा कोणी जिंकली लढाई, VIDEO

पाणघोडा आणि सिंह समोरासमोर भिडले; पाहा कोणी जिंकली लढाई, VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मैदानात सिंहीण पाणघोड्यासोबत पंगा घेताना दिसते. मात्र, पुढच्याच तिच्यासोबत जे घडतं त्याचा तिनं विचारही केला नसेल.

  नवी दिल्ली 16 ऑक्टोबर : इंटरनेटवर जंगली प्राण्यांचे अनेक व्हिडिओ (Videos of Wild Animals) सतत व्हायरल होत असतात. या व्हिडिओला सोशल मीडिया यूजर्सची (Social Media Users) चांगलीच पसंतीही मिळते. याच कारणामुळे या प्राण्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड होताच व्हायरल होतात. वाईल्डलाईफमध्ये रस असणारे फोटोग्राफर तर एक चांगला फोटो मिळवण्यासाठी कित्येक तास जंगलात घालवतात. अनेकदा जंगलातील भयानक प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडिओही कॅमेऱ्यात कैद होत असतात. सध्या असाच एक पाणघोडा आणि सिंहीणीच्या लढाईचा व्हिडिओ (Hippo and Lion Fight Video) व्हायरल होत आहे. यात अखेर कोण जिंकलं हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. VIDEO: कधीही पाहिला असा जुगाड; दुचाकीस्वाराची ही आयडिया पाहून व्हाल थक्क असं म्हटलं जातं, की सिंहीणीसोबत पंगा घेणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं. जंगलात कदाचितच कोणता प्राणी असा असेल जो या प्राण्यासोबत लढण्याची हिंमत करत असेल. मात्र, सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक पाणघोडा सिंहीणीला ओढत नेऊन आपटताना दिसतो. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन शेअर करण्यात आला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by طبیعت (@nature27_12)

  व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मैदानात सिंहीण पाणघोड्यासोबत पंगा घेताना दिसते. मात्र, पुढच्याच तिच्यासोबत जे घडतं त्याचा तिनं विचारही केला नसेल. सिंहीणीला थोड्याच वेळात समजतं की तिनं चुकीच्या प्राण्यासोबत पंगा घेतला आहे. यानंतर सिंहीण तिथून पळू लागते. मात्र, पाणघोडाही माघार घेत नाही. तो पळणाऱ्या सिंहीणीचा पाठलाग करून तिचं डोकं आपल्या जबड्यात पकडतो आणि पुन्हा जमिनीवर आदळतो. कुत्र्यावर मालकाकडून अमानुष अत्याचार; अवस्था पाहून डॉक्टरनं इंजेक्शन देऊन मारलं काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ nature27_12 नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. एका दिवसाआधी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 53 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Video Viral On Social Media, Wild animal

  पुढील बातम्या