जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पाळीव कुत्र्यावर मालकाकडून अमानुष अत्याचार; अवस्था पाहून डॉक्टरनं इंजेक्शन देऊन मारलं

पाळीव कुत्र्यावर मालकाकडून अमानुष अत्याचार; अवस्था पाहून डॉक्टरनं इंजेक्शन देऊन मारलं

पाळीव कुत्र्यावर मालकाकडून अमानुष अत्याचार; अवस्था पाहून डॉक्टरनं इंजेक्शन देऊन मारलं

या सुंदर कुत्र्याची झालेली वाईट अवस्था पाहून डॉक्टरांनी त्याला विषारी इंजेक्शन देऊन मारलं. त्याची अवस्था पाहून त्याला इंजेक्शन देणंच डॉक्टरांना योग्य वाटलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 16 ऑक्टोबर : माणूस आणि कुत्रा यांच्यातील नातं अगदीच खास असतं. कुत्रा हा जगातील सर्वात ईमानदार प्राण्यांपैकी एक आहे. काही लोक तर कुत्र्यांना अगदी आपल्या मुलांप्रमाणे जीव लावतात. मात्र, काही लोक सोशल स्टेट्ससाठी महागडे ब्रीड कुत्रे पाळतात आणि नंतर मात्र त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीत. असंच एक प्रकरण आता यूकेमधून (United Kingdom) समोर आलं आहे. इथल्या एका कपलनं आपल्या पाळीव कुत्र्याला (Pet Dog) अनेक दिवस उपाशी ठेवलं. या कपलनं कुत्र्याची अशी अवस्था केली, की पाहूनच थरकाप उडेल. मर्दानगी वाढवण्यासाठी या प्राण्याचं मांस खातायेत लोक; सरकार करतंय बंदीचा विचार या सुंदर कुत्र्याची झालेली वाईट अवस्था पाहून डॉक्टरांनी त्याला विषारी इंजेक्शन देऊन मारलं. त्याची अवस्था पाहून त्याला इंजेक्शन देणंच डॉक्टरांना योग्य वाटलं. रॉटवायलर ब्रीडच्या या कुत्र्याचा प्रचंड छळ केला गेला होता. लोकल अॅनिमल क्रुएल्टी इन्स्पेक्टरनं सांगितलं, की आतापर्यंत पाहिलेला हा सर्वात अशक्त कुत्रा आहे. आतापर्यंत त्यांनी इतकं क्रूर प्रकरण पाहिलं नव्हतं. 57 वर्षीय व्यक्तीचं घोडीसोबत विकृत कृत्य; CCTV फुटेज पाहून मालकीणीला बसला धक्का इन्स्पेक्टर जेव्हा घरात गेला तेव्हा कुत्रा किचनच्या फ्लोअरवर झोपला होता. त्याला उठवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, तो इतका अशक्त झालेला की त्याला उठताही येत नव्हतं. नंतर स्ट्रेचरवरुन त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. त्याला पाहून डॉक्टरही हैराण झाले. त्याची अवस्था अतिशय बिकट झाली होती. त्याची हाडे आणि बरगड्याही दिसत होत्या. त्याला चालताही येत नव्हतं. वेदनेनं तो ओरडत होता. तो अन्नही खात नव्हता. अखेर डॉक्टरांनी त्याला विषारी इंजेक्शन देऊन मारून टाकलं. यानंतर कोर्टात त्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. आयुष्यभर त्याच्यावर प्राणी पाळण्याबाबत बॅन लावण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात