मराठी बातम्या /बातम्या /Viral /इथले लोक दुसऱ्या देशातून ऑर्डर करतात पिझ्झा; विमानाने होते डिलिव्हरी, कारण जाणून चक्रावून जाल

इथले लोक दुसऱ्या देशातून ऑर्डर करतात पिझ्झा; विमानाने होते डिलिव्हरी, कारण जाणून चक्रावून जाल

नायजेरियात राहणारे लोक आपल्या देशाऐवजी इंग्लंडमधून पिझ्झा (pizza) मागवत आहेत. ही माहिती अन्य कुणी दिली नसून खुद्द देशाच्या कृषीमंत्र्यांनी दिली आहे

नायजेरियात राहणारे लोक आपल्या देशाऐवजी इंग्लंडमधून पिझ्झा (pizza) मागवत आहेत. ही माहिती अन्य कुणी दिली नसून खुद्द देशाच्या कृषीमंत्र्यांनी दिली आहे

नायजेरियात राहणारे लोक आपल्या देशाऐवजी इंग्लंडमधून पिझ्झा (pizza) मागवत आहेत. ही माहिती अन्य कुणी दिली नसून खुद्द देशाच्या कृषीमंत्र्यांनी दिली आहे

नवी दिल्ली 10 जून : बदलत्या काळासोबत लोकांना अशा अनेक सुविधा मिळाल्या, ज्यामुळे त्यांचं जीवन सुकर झालं. पूर्वी जिथे लोकांना बाहेर जाऊन जेवावं लागायचं, तिथे आता ऑनलाइन फूड डिलिव्हरीमुळे लोकांना घरबसल्या जेवण पोहोच होतं. आता घरी बसून तुम्ही तुमच्या आवडीच्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करून खाऊ शकता. पण काळाने एवढी प्रगती केली आहे की आता काही लोकांना घराजवळून नाही तर परदेशातूनही अन्न मागवता येत आहे. होय, याचं उदाहरण नायजेरियामध्ये पाहायला मिळतं (Rich Nigerians ordering Pizza from Another Country).

अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्याने पालटलं महिलेचं नशीब; काही तासातच झाली 19 कोटींची मालकीण

मिळालेल्या माहितीनुसार, नायजेरियात राहणारे लोक आपल्या देशाऐवजी इंग्लंडमधून पिझ्झा मागवत आहेत. इथे राहणारे श्रीमंत लोक परदेशातून स्वतःसाठी पिझ्झा मागवत आहेत. ही माहिती अन्य कुणी दिली नसून खुद्द देशाच्या कृषीमंत्र्यांनी दिली आहे. कृषीमंत्री औदू ओग्बेह यांच्या म्हणण्यानुसार, नायजेरियन लोक आपली श्रीमंत आणि स्टेटस दाखवण्यासाठी परदेशातून पिझ्झा मागवत आहेत. ही ऑर्डर त्यांच्या घरी विमानाने पाठवली जाते.

परदेशातून पिझ्झा मागवण्याचा छंद इतरांनाही हैराण करत आहे. लोक रात्री हा पिझ्झा ऑर्डर करतात. यानंतर पिझ्झा तयार केला जातो आणि चांगला पॅक केला जातो. त्यानंतर पॅक केलेला पिझ्झा ब्रिटिश एअरवेजने नायजेरियाला पाठवला जातो. सकाळी विमानतळावर आल्यानंतर पत्त्यानुसार त्याची रवानगी केली जाते. केवळ छंदापोटी लोक ६४४० किलोमीटर अंतरावरून पिझ्झा मागवत असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

फुकटात घरी आणला सेकंड हॅण्ड सोफा, आतमध्ये सापडले 28 लाख रुपये!

शौकिनांच्या या निर्णयामुळे स्थानिक विक्रेत्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा ऑर्ड्सना आळा घालण्याची मागणी अनेकांनी सरकारकडे केली आहे. यासाठी कृषीमंत्र्यांनीही प्रस्ताव दिला होता. श्रीमंत लोक केवळ आपल्या छंदासाठी इंग्लंडमधून पिझ्झा मागवून खात आहेत, तर स्थानिक विक्रेत्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. सरकारने जनतेला या ऑर्डर देऊ नयेत, असे आवाहनही केले आहे. यानंतरही स्टेटस सिम्बॉलसाठी लोक सतत परदेशातून पिझ्झा मागवत आहेत.

First published:
top videos

    Tags: Food, Pizza