रायपूर 10 जून : छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात एक अनोखा विवाह पार पडला, ज्यामध्ये एका वराने एकाच मंडपात दोन नवऱ्यांसोबत फेरे घेतले. या लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लग्नाला दोन्ही मुलींची संमती होती. हे संपूर्ण प्रकरण छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यातील केसकालच्या इरागाव भागातील उमला गावातील आहे. यात नवरदेव लग्नाआधीच दोन मुलांचा बाप आणि दोन तरुणींचा नवराही बनला आहे (Man Married with 2 Girlfriends). भयंकर अपघातानंतर कोमात गेली तरुणी; शुद्धीवर येताच प्रियकराचा मेसेज पाहून झाली शॉक इरागाव पोलीस ठाण्यांतर्गत उमला गावात राहणारे राजन सिंहचे वडील सुखराम सलाम यांनी अडेंगा गावातील दुर्गेश्वरी मरकम यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. पुढे दोघांच्याही मुला-मुलीचा साखरपुडा झाला. तेव्हापासून तरुणी मुलाच्या घरीच राहू लागली. काही महिन्यांनी तरुणीने एका बाळाला जन्म दिला. दरम्यान, राजन सिंह आंवरी येथील रहिवासी सन्नोबाई गोटा हिच्या प्रेमात पडला. सन्नो आणि राजन सिंह यांचं प्रेम इतकं पुढे गेलं की या तरुणीनेही एका बाळाला जन्म दिला. VIDEO: लग्नानंतर पहिल्याच दिवशी नवरीला उचलून जमिनीवर आपटलं; नवरदेवाचं कृत्य पाहून सगळेच हैराण लग्नाआधीच असलेल्या या प्रेमसंबंधांमुळे दोन्ही तरुणींना लग्न न करताच मुलं झाली. हे प्रकरण गावात पसरताच लोकांमध्ये चर्चा सुरू झाल्या. यानंतर राजनसिंहने कुटुंबीयांची परवानगी घेऊन दोघींसोबतही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या पत्रिकेतही दोन्ही नवऱ्यांची नावं लिहिण्यात आली आणि अखेर हा विवाह पार पडला. या लग्नात उमला गावासह आजूबाजूचे लोकही सहभागी झाले आणि वधू वराला आशिर्वाद दिले. मात्र हे अनोखं लग्न परिसरात चर्चेचा विषय ठरलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.