नवरदेवाचे काही मित्रही स्टेजवर आले आहेत. ते नवरी आणि नवरदेवावर पैशांच्या नोटा उधळताना दिसतात. मात्र, यादरम्यान असं काही घडतं, जे पाहून नवरदेव चांगलाच भडकतो
नवी दिल्ली 28 जानेवारी : लग्नसमारंभात लोक अतिशय मस्ती करतात. लग्नातील अनेक निरनिराळे व्हिडिओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. या व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरदेव तसंच लग्नात सहभागी इतर पाहुणेही अगदी उत्साहात एन्जॉय करताना दिसतात. मात्र अनेकदा लग्नात असं काही घडतं, की ज्यामुळे हे लग्नच चर्चेचा विषय ठरतं. सध्या अशाच एका लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Funny Wedding Video Viral) झाला आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नवरदेव आणि नवरी स्टेजवर बसलेले दिसतात. दोघंही आपलं लग्न एन्जॉय करत आहेत. नवरदेवाचे काही मित्रही स्टेजवर आले आहेत. ते नवरी आणि नवरदेवावर पैशांच्या नोटा उधळताना दिसतात. मात्र, यादरम्यान असं काही घडतं, जे पाहून नवरदेव चांगलाच भडकतो. यानंतर तो आपल्या मित्राला चापट मारतो (Groom Slapped his Friend in Marriage Hall).
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की मित्राचं हे कृत्य पाहून नवरदेव इतका भडकतो की लगेचच त्याला अद्दल घडवतो. हा व्हिडिओ अतिशय मजेशीर आहे. व्हिडिओ तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरेल. ही मजेशीर घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून इन्स्टाग्रामवर याचा व्हिडिओ शेअर केला गेलाल आहे. यात तुम्ही पाहू शकता, की नवरी-नवरदेवाच्या समोर आणि शेजारी उभा राहून दोन मित्र त्यांच्यावर पैशाच्या नोटा उधळत आहेत. इतक्यात एक मित्र नवरी आणि नवरदेवाच्या अंगावर पडतो.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की मित्र नवरदेवाच्या बाजूला बसण्याचा प्रयत्न करतो मात्र इतक्यात तोल जातो आणि तो नवरी तसंच नवरदेवाच्या मांडीवर कोसळतो. हे पाहून नवरदेव आपल्या मित्राला जोरात चापट लगावतो. यासोबतच तो आपल्या मित्राला तिथून जाण्यासही सांगतो. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर अनेकांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.