लखनऊ, 21 फेब्रुवारी : अद्यापही देशातून कोरोना गेलेला नाही. तरीही लोक बिनधास्तपणे मास्क न लावता घराबाहेर पडत आहेत. स्वत:च्या जिवाची पर्वा न करणं अशी ही वागणूक संतापजनक आहे. लोकांना आता कोरोनाची भीतीच नसल्याचं यावरुन दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील (UP News) गाजियाबाद येथून (Ghaziabad Viral Video) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांना स्वत:च्या जीवाची पर्वा नाही याच्याशी हा व्हिडीओ संलग्न आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला घरातील खिडक्यांची काच स्वच्छ करीत आहे. तसं तर यात काही नाही. प्रत्येक महिला करतेच की..मात्र ही महिला खिडकीच्या बाहेरून काच साफ करीत आहे, आणि देखील चौथ्या मजल्यावरुन…तिचा हा व्हिडीओ पाहून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहे. हा व्हिडीओ समोरच्या इमारतीतून एका महिलेने शूट केल्याची शक्यता आहे. या व्हिडीओत महिलेने खिडकी साफ करण्याच्या पद्धतीवर चिंता व्यक्त केली आहे. पाय घसरला तर किती महागात पडू शकतं याची जाणीव नसल्याचं तिचं म्हणणं आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला असून विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही येत आहेत.
हे ही वाचा- टेकडीवरुन 300 फूट खाली कोसळला पण…, बचावासाठी एअर फोर्सचे अथक प्रयत्न, VIDEO हा व्हिडीओ गाजियाबादमधील इंदिरापूरम येथील शिप्रा रिवेरा सोसायटीचा आहे. हा व्हिडीओ रविवारचा असल्याचं सांगितलं जात आहे. थोडासाही निष्काळजीपणाचा किती भयंकर परिणाम होऊ शकतो, याचा विचारही करू शकत नाही.