मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Heart Attack Viral Video : पुतण्याच्या लग्नात डान्स करत होते काका अन् 5 सेकंदात झालं होत्याच नव्हत, LIVE VIDEO

Heart Attack Viral Video : पुतण्याच्या लग्नात डान्स करत होते काका अन् 5 सेकंदात झालं होत्याच नव्हत, LIVE VIDEO

पुतण्याच्या लग्नात नाचताना अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने जागीच कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पुतण्याच्या लग्नात नाचताना अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने जागीच कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पुतण्याच्या लग्नात नाचताना अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने जागीच कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Varanasi, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

वाराणसी, 30 नोव्हेंबर : मागच्या काही दिवसांत थंडीत वाढ झाल्याने रक्त गोठण्याच्या प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत असते यामुळे हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कोणाला वाहन चालवताना झटका येऊन धक्का बसत आहे तर कुणाला नाचताना हृदयविकाराचा झटका येत आहे. दरम्यान वाराणसीमध्ये अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पुतण्याच्या लग्नात नाचताना अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने जागीच कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

वाराणसीच्या पिपलानी कटरा अवघडनाथ टाकिया येथील मनोज विश्वकर्मा (वय 40) हे पुतण्याच्या लग्नात आनंदाने नाचत होते. त्यांना अचानक हृदयविकाराच्या झटका आल्याने ते जागीच कोसळले. लग्न सोहळ्यात अचानक घडलेल्या घटनेने सगळ्यानाच मोठा धक्का बसला आहे. अवघ्या काही मिनीटात आनंदाच्या भरात नाचणाऱ्या सगळ्यांना दु:खद घटनेला सामोरे जावे लागले असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा : बारामती हादरली, मुलगी पळून गेल्याचा राग अनावर; प्रियकराच्या भावासोबत धक्कादायक कृत्य

औघडनाथ टाकिया येथील रहिवासी मनोज विश्वकर्मा यांच्या कुटुंबात 25 नोव्हेंबरला लग्न होते. दुपारी मिरवणुकीसाठी कुटुंबात जय्यत तयारी सुरू होती. वरातीत नाचताना मनोज यांची प्रकृती अचानक बिघडली आणि ते नाचतानाच बेशुद्ध पडले.

यावेळी आजुबाजुला असलेल्या लोकांना त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेले. परंतु त्यांना ह्रदयविकाराचा झटका मोठा आल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने कुटुंबात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : स्‍पेशल लेन्स, मायक्रो चिप, QR कोड; जुगाऱ्यांच्या हायटेक तंत्रज्ञानाने पोलीसही अचंबित

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुतण्याच्या लग्नात नाचताना काकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यावेळी वरातीमधील लोकांना ते एखादी स्टेप करत असल्याचे वाटत होते. पण ते अचानक कोसळले आणि उठत नसल्याचे लक्षात येताच नातेवाइकांनी त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मनोज विश्वकर्मा असे मृताचे नाव असून त्याचे वय 40 वर्षे आहे. ते दागिन्यांचा व्यवसाय करत होते.

First published:

Tags: Heart Attack, Heartbreaking, Uttar pradesh, Uttar pradesh news