बंगळुरू, 28 नोव्हेंबर : जुगार खेळताना अनेक चित्रपटांमध्ये हातचलाखी करणारे लोक तुम्ही पाहिले असतील. मात्र, बंगळुरूमध्ये एक असं प्रकरण समोर आले आहे, ज्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. यशवंतपूर पोलिसांनी एका जुगार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे जे प्रत्येक गेम जिंकण्यासाठी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचे कार्ड स्पेशल कॉन्टॅक्ट लेन्स आणि मायक्रोचिपने स्कॅन करत होते. आत्तापर्यंत असे तंत्रज्ञान विशेषतः जेम्स बाँड चित्रपटात दाखवले जात होते. गेल्या दोन वर्षांतील ही दुसरी घटना असली तरी. यापूर्वी 2020 मध्ये, आरटी नगरच्या इम्रान बिन इस्माईलला बेंगळुरू सेंट्रल क्राइम ब्रँचने अशा तंत्राचा वापर करून बेकायदेशीर कमाई केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. जुगार खेळणाऱ्यांना पकडण्यासाठी बेंगळुरू पोलिसांनी सापळा रचला होता. मात्र, प्रत्येक वेळी नवीन आणि हायटेक तंत्रज्ञान पाहून त्यांनाही धक्का बसला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, साधारण आठवडाभरापूर्वी महंतेश आणि रमेश यांना साध्या पत्त्यांचा जुगार खेळताना पकडण्यात आले होते. त्यात एक क्यूआर कोड एम्बेड केला होता आणि नॅनो चिप बसवण्यात आली होती. त्यामुळे जुगार खेळणाऱ्यांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडे कोणते पत्ते आहेत, याची माहिती मिळायची, त्यामुळे त्यांना विजयाचा सट्टा खेळायला मिळत असे. कार्डवर QR कोड कॉन्टॅक्ट लेन्सच्या मदतीने स्कॅन महंतेश आणि रमेश यांनी चौकशीदरम्यान उघड केले की ते कार्डवर तयार केलेला क्यूआर कोड स्कॅन करून आणि कॉन्टॅक्ट लेन्स वापरून इतर खेळाडूंना मात देत होते. ही कार्डे सर्वसामान्यांसाठी सामान्य कार्डांसारखी होती. मात्र, ती चतुराईने बदलण्यात आली. यामध्ये नॅनो चिप होती आणि कार्डच्या कव्हरवर केलेल्या डिझाईनमध्ये QR कोड लपविला होता. हा QR कोड स्कॅन करण्यासाठी जुगार खेळणारे विशेष लेन्स वापरत असत. वाचा - काकाला मारलेल्या आरोपीचा प्रताप; पोलिसांच्या वाहनाचा घडवून आणला अपघात, अन्.. याद्वारे ते इतर खेळाडूंच्या टेबलावर कोणती कार्डे आहेत हे शोधून काढायचे. यानंतर ते जिंकण्यासाठी आपली चाल खेळत. पोलिसांनी सांगितले की, या जुगारांनी संपूर्ण खोलीत स्पाय कॅमेरे बसवले आहेत हे माहीत होते. याद्वारे त्यांना कार्ड्सची माहिती मिळायची आणि ते आपल्या खेळाडूंना द्यायची. ते वेगवेगळ्या टेबलांवर जाऊन गेम जिंकण्याचा प्रयत्न करायचे. हे लोक इअरपीसद्वारेही माहिती मिळवायचे आणि त्यानंतर ते आपली चाल खेळत.
आरोपींसोबत खेळल्यानंतर गोष्टींचा उलगडा पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, या जुगाऱ्यांचे तंत्र समजून घेण्यासाठी आम्ही आरोपींसोबत हा गेम खेळला आणि हे लोक कोणत्याही गेममध्ये कसे जिंकायचे हे समजले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी त्यांच्या कामात निष्णात आहेत आणि ते कोणालाही सहज मात देऊ शकतात. त्यांच्याकडे हायटेक लेन्स सापडल्या आहेत ज्या ऑनलाइन खरेदी केल्या होत्या. या उपकरणांचे निर्माते आणि वितरक दिल्ली आणि राजकोटमध्ये सापडले आहेत. यापूर्वी पकडलेला इम्रान आणि नुकतेच पकडलेले दोन आरोपी यांच्यातही पोलीस दुवा शोधत आहेत, कारण त्यांची कार्यपद्धती सारखीच आहे.