• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO : घराच्या छताला लटकताना दिसलं महिलेचं डोकं; सत्य समजताच सरकली कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन

VIDEO : घराच्या छताला लटकताना दिसलं महिलेचं डोकं; सत्य समजताच सरकली कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन

घरातील लोकांनी जेव्हा हिंमत करून छताला लटकलेल्या केसांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते हैराण झाले. कारण हे त्यांच्याच मुलीचं डोकं होतं

 • Share this:
  नवी दिल्ली 01 सप्टेंबर : घरात लहान मुलं असतील तर प्रत्येक बाबतीत आपल्याला अतिशय सावधगिरी बाळगावी लागते. मात्र, नेहमीच प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणं शक्य होत नाही आणि याच काळात काहीतरी मोठी दुर्घटना (Accident News) घडते. चीनमधून (China) अशीच एक विचित्र घटना (Weird News) समोर आली आहे. या घटनेचा यूट्यूब व्हिडिओ (YouTube Video) सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. ही घटना चीनच्या गुइझोउ येथील पुडिंग काउंटी इथल्या एका घरातील आहे. इथे सिलिंगला एक एक्सट्रॅक्टर फॅन लावण्यासाठी 8 इंचाचं छेद केलं गेलं होतं. याची माहिती घरात राहणाऱ्या एका लहान मुलीला नव्हती. उत्सुकतेमुळे ती या बिळातून डोकावण्याचा प्रयत्न करू लागली. घरातील लोकांचं लक्ष जेव्हा छताकडे गेलं तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांना हे दृश्य एखाद्या हॉरर सिनेमाप्रमाणेच दिसलं. तालिबान्यांनी हेलिकॉप्टरला प्रेत टांगून फिरवलं? पाहा VIRAL VIDEO मागील सत्य घरातील लोकांनी जेव्हा हिंमत करून छताला लटकलेल्या केसांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते हैराण झाले. कारण हे त्यांच्याच मुलीचं डोकं होत, जे या बिळामध्ये अडकलं होतं. त्यांनी लगेचच मुलीचं डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र अपयशी ठरले आणि यानंतर फायर फायटर्सला (Fire Fighters) बोलवण्यात आलं. प्रोफेशनल टीम लगेचच कामाला लागली आणि या मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. VIDEO : ड्रोनवर हल्ला करण्यासाठी पाण्याबाहेर आली मगर पण...; पाहा पुढे काय घडलं फायर फायटर्सच्या टीमनं आधी हातानंच या मुलीचं डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर सोबत आणलेल्या उपकरणांचा उपयोग केला. मात्र, तरीही या मुलीचं डोकं बाहेर काढण्यात यश आलं नाही. अखेर खाद्यतेल ओतून ही जागा घसरट केली गेली आणि या मुलीचं डोकं बाहेर काढण्यात आलं. या घटनेत मुलीला कोणतीही दुखापत झाली नसून ती पूर्णपणे सुरक्षित आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: