Home /News /viral /

ड्रोनवर हल्ला करण्यासाठी पाण्याबाहेर आली मगर पण...; VIDEO मध्ये पाहा पुढे काय घडलं

ड्रोनवर हल्ला करण्यासाठी पाण्याबाहेर आली मगर पण...; VIDEO मध्ये पाहा पुढे काय घडलं

आपल्या सर्वांना माहिती आहे, की पाण्यात राहणारी मगर नदीच्या काठावर येणाऱ्या कोणत्याही प्राण्याची शिकार करू शकते. मात्र, सध्या एक अजब व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे.

  नवी दिल्ली 01 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) जंगली प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Videos of Wild Animals) झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल. प्राण्यांचे हे व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात बघितले जातात आणि याला नेटकऱ्यांची विशेष पसंतीही मिळते. यूजर्सही हे व्हिडिओ मनोरंजनाचं एक उत्तम साधण असतं. सध्या असाच एक व्हिडिओ (Crocodile Video) समोर आला आहे, जो पाहून तुम्हालाही मजा येईल. OMG! इथं मिळतोय 2000 रुपयाला एक वडापाव; इतकं काय आहे यात खास? आपल्या सर्वांना माहिती आहे, की पाण्यात राहणारी मगर नदीच्या काठावर येणाऱ्या कोणत्याही प्राण्याची शिकार करू शकते. मात्र, सध्या एक अजब व्हिडिओ समोर आला आहे. यात दिसतं, की मगर कोणत्या प्राण्याला नाही तर एका ड्रोनला आपलं शिकार बनवण्याच्या प्रयत्नात आहे. पुढे नेमकं काय घडतं हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहा. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका नदीमध्ये अनेक मगरी आहेत. इतक्यात तिथं एक ड्रोन येतं. यानंतर यातील एक मगर पाण्यातून बाहेर येते आणि ड्रोनलाच आपलं शिकार बनवण्यासाठी प्रयत्न करू लागते. इतक्यात ड्रोन मागे जातं आणि मगरीला हार मानावी लागते.
  लग्नातच भिडले नवरी-नवरदेव, फक्त केळ्यासाठी भरमंडपात जुंपली; VIDEO VIRAL सोशल मीडियावर या व्हिडिओला लोकांची भरपूर पसंती मिळत आहे. एका यूजरनं म्हटलं, की विचार करा! मगरीनं जर या ड्रोनची शिकार केली असती तर तिला जास्त पश्चाताप झाला असता. तर, दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की अशा भागात आपण ड्रोनचा वापर नाही करायला पाहिजे. याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर insta.mandeers नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत याला 23 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Viral video on social media, Wild animal

  पुढील बातम्या