Home /News /viral /

तालिबान्यांनी हेलिकॉप्टरला प्रेत टांगून शहरातून फिरवलं? जाणून घ्या VIRAL VIDEO मागील सत्य

तालिबान्यांनी हेलिकॉप्टरला प्रेत टांगून शहरातून फिरवलं? जाणून घ्या VIRAL VIDEO मागील सत्य

मंगळवारी आणखी एक व्हिडिओ (Viral Video From Afghanistan) समोर आला. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला हेलिकॉप्टरला लटकवलं गेलं होतं.

    नवी दिल्ली 01 सप्टेंबर : 20 वर्षाच्या मोठ्या लढ्यानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानातून (American Soldiers Leave Afghanistan) आपलं सैन्य माघारी घेतलं आहे. 30 ऑगस्टला अमेरिकेच्या सैन्यानं अफगाणिस्तान सोडलं. यादरम्यान आपली अनेक हत्यारं, एअरक्राफ्ट आणि वाहनही त्यांनी काबूलमध्येच (Kabul) सोडले. यानंतर आता अफगाणिस्तानवर तालिबाननं पूर्णपणे कब्जा केला आहे. तालिबाननं कब्जा करताच अफगाणिस्तानातून अनेक विचित्र घटना समोर आल्या आहेत, अशात आता मंगळवारी आणखी एक व्हिडिओ (Viral Video From Afghanistan) समोर आला. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला हेलिकॉप्टरला लटकवलं गेलं होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. सोशल मीडियावर असा दावा केला गेला, की अमेरिकन सैन्याच्या (American Forces) वापसीनंतर विमानतळावर एक हेलिकॉप्टर उडत होतं. याला एक व्यक्ती लटकलेला होता. असा दावा केला जात होता, की अमेरिकी सैन्याची मदत केल्याप्रकरणी या व्यक्तीला तालिबाननं शिक्षा दिली आहे आणि अमेरिकेच्या सैन्य वापसीनंतर तालिबाननं आपला खरा रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये हा दावा केला जात असतानाच आता अफगाणिस्तानच्या पत्रकारांनी या व्हायरल व्हिडिओबाबतचं वेगळंच सत्य समोर आणलं आहे. काश्मीर अभी बाकी है! तालिबानच्या विजयी घोषणेनंतर अल कायदाचं मोठं विधान, म्हणाले. ज्या हेलिकॉप्टरला हा व्यक्ती लटकला होता ते अमेरिकी हेलिकॉप्टर हॉक होतं. सोशल मीडियावर तालिबानी शिक्षेचा दावा केला जात असतानाच स्थानिक पत्रकारांनी या व्हिडिओ सत्य सांगितल्यानं सगळेच हैराण झाले. जो व्यक्ती हेलिकॉप्टरला लटकला आहे, तो तब्बल 100 मीटर उंच झेंडा फडकवण्याचं काम करत होता. म्हणजेच त्याला कोणतीही शिक्षा दिली जात नव्हती. हेलिकॉप्टरला लटकलेला व्यक्ती एक तालिबानीच आहे, जो झेंडा लावण्यासाठी लटकलेला होता. हेलिकॉप्टरच्या मदतीनं तो हे काम करत होता. मात्र, यात तो यशस्वी झाला नाही. अफगाण सैन्यातील 'त्या' अधिकाऱ्यांना तालिबानकडून धोका; भारताकडे मागितली मदत अमेरिकी पत्रकारानं पोस्ट केलेल्या व्हिडिओचं उत्तर देत अफगाण पत्रकार बिलालनं ट्विट करत सांगितलं, की जो व्यक्ती हेलिकॉप्टर उडवत आहे, त्याला अमेरिका आणि यूएईमध्येच ट्रेनिंग दिलं गेलं आहे. व्हिडिओमध्ये एक तालिबानी व्यक्ती आहे, जो झेंडा फ़डकवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र यात अपयशी ठरला. व्हायरल व्हिडिओमध्ये असं दिसत आहे, की या व्यक्तीला दोरीच्या मदतीनं हेलिकॉप्टरला लटकवलं आहे. मात्र, व्हिडिओ झूम करून पाहिल्यास दिसतं, की या व्यक्तीला बांधलं गेलं आहे. जेणेकरून तो झेंडा लावू शकेल.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Afghanistan, Taliban, Viral video on social media

    पुढील बातम्या