मुंबई, 08 जून : भारताचा खूप मोठा आणि रहस्यमयी इतिहास आहे. ज्याबद्दल अनेकांना अजून संपूर्ण माहिती नाही. त्यापैकीच एकाबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहेत. ज्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तुम्ही कधी ऐकले आहे का की राजवाड्याची किंवा किल्ल्याची भिंत रक्ताचे अश्रू रडते? मध्य प्रदेशात असाच एक किल्ला आहे, ज्याच्याबद्दल इतक्या दंतकथा प्रचलित आहेत की, ते ऐकून तुम्हाला त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळणार नाही. मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील सबलगड किल्ल्यातील अशा रहस्यमय गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील. या किल्ल्यामागे कोणती रहस्ये दडलेली आहेत, चला जाणून घेऊया भारतातील रहस्यमय दरवाजा, जो उघडला तर प्रत्येक भारतीय होईल श्रीमंत 17 व्या शतकात बांधलेल्या सबलगड किल्ल्यामध्ये अनेक ऐतिहासिक तथ्ये आहेत. या किल्ल्यावर अनेक राजे-सम्राटांचे सिंहासन आणि मुकुटाने अनेक गोष्टी मिळवण्या पण नंतर त्या सगळ्या मातीमोल ठरल्या. सुमारे चार शतके जुना हा किल्ला आजही अभिमानाने उभा आहे. मात्र या ऐतिहासिक वारशाकडे आजूबाजूचे लोक याला भीतीने पाहतात, ही खेदाची बाब आहे. त्याबद्दलच्या लोकप्रिय कथा ऐकून धाडसी लोकांनाही घाम फुटेल. दिवसाही सबलगड किल्ल्यावर जाताना भीती या किल्ल्याच्या भिंतीवरून रक्ताचे थेंब पडत असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. म्हणजे इथे दगड सुद्धा रक्ताचे अश्रू रडतात. रात्री किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना येथून रडण्याचा आवाज येतो. सबलगढचा किल्ला कधीकाळी चंदेला राजांच्या अधिपत्याखाली होता, तर कधी गुप्त मौर्य आणि कुशाण राजांच्या अधिपत्याखाली होता. स्थापत्यकलेचा आणि कारागिरीचा एक भव्य नमुना म्हणून त्याची विशालता आणि सौंदर्य पाहून आजही लोकांना आश्चर्य वाटते. पण किल्ल्याशी निगडीत कथा अशा झाल्या आहेत की, लोक दिवसाही या किल्ल्यावर जायला घाबरतात, मग रात्री इथे जाण्याचं तर लांबच राहिलं. भारतातील रहस्यमयी किल्ला, इथे जाणारा पुन्हा कधीही येत नाही परत गडावर कोणी जात नाही या गडाच्या इतिहासाविषयी स्थानिक लोक सांगतात की, एकेकाळी राजा-राणी आपल्या संपूर्ण कुटुंबासह येथे राहत असत. किल्ल्याच्या आत नेहमी चमक आणि हालचाल असायची. मात्र आजच्या तारखेत हा किल्ला ओसाड पडून आहे. किल्ल्याबद्दल भीती इतकी पसरली आहे की न्यूज 18 च्या टीमने गावातील लोकांना त्यांच्यासोबत गडावर जाण्यास सांगितले, तेव्हा सर्वांनी नकार दिला. पण आमची टीम गडावर पोहोचली, तिथे त्याचा चौकीदार सापडला. भिंतीतून नाही तर दगडातून रक्त वाहते किल्ल्यावरील पहारेकऱ्याने सांगितले की, या किल्ल्यात एक दगड आहे, जो रक्ताच्या अश्रू ढाळतो. या किल्ल्यातील राजाच्या मुलाचा शत्रूंनी भिंतीवर डोके आपटून मारले, अशी कथा आहे. तेव्हापासून त्या दगडातून रक्त वाहत आहे. गावातील काही जुण्या लोकांनी भिंतीतून रक्ताचे अश्रू वाहत असल्याचेही पाहिले आहे. राजपुत्राच्या आत्म्याला मोक्ष मिळाला नाही, त्यामुळे आजही भिंतीतून रक्त येते, अशी ग्रामस्थांची धारणा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







