जाहिरात
मराठी बातम्या / Viral / भारतातील रहस्यमय दरवाजा, जो उघडला तर प्रत्येक भारतीय होईल श्रीमंत

भारतातील रहस्यमय दरवाजा, जो उघडला तर प्रत्येक भारतीय होईल श्रीमंत

भारतातील रहस्यमयी ठिकाण

भारतातील रहस्यमयी ठिकाण

आता हे ऐकल्यानंतर तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणीबद्दल जाणून घेण्याची उत्सुक्ता निर्माण झाली असेल? चला या ठिकाणाबद्दल जाणून घेऊ.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 एप्रिल : रहस्यमय ठिकाणींची भारतात कमी नाही. अशा अनेक जागा आहेत, ज्याचं गुपीत अनेकांना माहित नाही किंवा जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. भारताचा इतिहासच असा आहे की, भारतात बऱ्याच गोष्टींचं गुंढ लपलंय. त्यांपैकी एक म्हणजे ‘सोन भंडार’. ज्याचं गुपित आजही उलगडलेलं नाही. वैज्ञानिकांनी आणि इतिहासकारांनी यामागचं गुपित शोधण्याचे अनेक प्रयत्न केले, पण अनेक वर्ष उलगडून सुद्धा हे ठिकाण आजही एक रहस्यच आहे. ‘सोन भंडार’ बद्दल अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की यामध्ये इतकं सोनं लपलंय की ते जर आपल्याला मिळालं तर भारतातील प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होऊ शकते. आता हे ऐकल्यानंतर तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणीबद्दल जाणून घेण्याची उत्सुक्ता निर्माण झाली असेल? चला या ठिकाणाबद्दल जाणून घेऊ. भारतातील रहस्यमयी किल्ला, इथे जाणारा पुन्हा कधीही येत नाही परत ‘सोन भंडार’ हे बिहारमधील नालंदा येथे आहे. राजगीरमध्ये असलेल्या या सोन्याच्या भांडाराबद्दल असे म्हटले जाते की हर्यक वंशाचा संस्थापक बिंबिसाराच्या पत्नीने यामध्ये आपले सोने लपवले होते, जे आजही लोकांच्या नजरेपासून लपलेले आहे. अनेकांनी आता जाऊन या खजिन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण आजपर्यंत या खजिन्यापर्यंत कोणीही पोहोचू शकलेलं नाही. इतिहासकारांच्या मते, हरियांका राजघराण्याचा संस्थापक बिंबिसराला सोन्या-चांदीची प्रचंड ओढ होती. बिहारच्या या गुहेत हरियांका राजघराण्याचा हाच खजिना लपवून ठेवला असल्याचे सांगितले जाते. इंग्रजांनी एकदा आत जाण्याचा प्रयत्नही केला होता, पण त्यात त्यांना अपयशच हाती लागले. सोन भंडार गुहा कशी आहे आणि त्यात आहे तरी काय? सोन भंडार गुहेत प्रवेश केल्यावर १०.४ मीटर लांब आणि ५.२ मीटर रुंद खोली आहे. या खोलीची उंची सुमारे 1.5 मीटर आहे. खजिन्याचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी ही खोली बनवण्यात आली होती. या खोलीच्या दुसऱ्या बाजूला खजिना खोली आहे, जी एका मोठ्या दगडाने झाकलेली आहे. जे आजपर्यंत कोणीही उघडू शकले नाही. त्यामुळेच आजपर्यंत ही लेणी विज्ञान आणि इतिहासकारांसाठी एक कोडेच राहिली आहे.

News18

मौर्य शासकाच्या काळात बांधलेल्या या गुहेच्या दारात असलेल्या या दगडात शंख लिपीत काहीतरी लिहिलेले आहे. या संदर्भात असे मानले जाते की हा खजिना उघडण्याचे रहस्य या शंख लिपीत लिहिलेले आहे. असे म्हटले जाते की जर कोणी ही लिपी वाचण्यात यशस्वी झाला तर तो सोन्यापर्यंत पोहोचू शकतो. तसेच आपल्या कल्पनेपेक्षा जास्त सोन्याचा साठा त्यात असू शकतो, असेही अनेक तज्ज्ञ सांगतात. बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रु हा आपल्या वडिलांना सत्तेसाठी कैद करून मगधचा सम्राट झाला. अजातशत्रूने एकतर बिंबिसाराचा वध केला असावा किंवा त्याने आत्महत्या केली असावी, परंतु त्याच्या मृत्यूनंतर आजपर्यंत या खजिन्याचे गूढ कोणालाही शोधता आलेले नाही. असे म्हणतात की या गुहेत ठेवलेला खजिना आणि गुहेच्या गुप्त दरवाजापर्यंत पोहोचण्याचे रहस्य फक्त बिंबिसारालाच माहीत होते. गुहेच्या खजिन्याशी संबंधित आणखी एक कथा प्रचलित आहे, ज्याच्या संबंध महाभारत काळाशी आहे. वायु पुराणानुसार, हरियांका राजवंशाच्या राजवटीच्या सुमारे 2500 वर्षांपूर्वी, मगधवर शिवभक्त जरासंधाचे वडील वृहद्रथचे राज्य होते. बृहद्रथानंतर जरासंध सम्राट झाला. चक्रवर्ती सम्राट होण्याच्या उद्देशाने 100 राज्यांचा पराभव करण्यासाठी निघाले. जरासंधने 80 हून अधिक राजांचा पराभव करून त्यांची संपत्ती हस्तगत केली.

News18लोकमत
News18लोकमत

वायु पुराणानुसार विभरगिरी पर्वताच्या पायथ्याशी गुहा बनवून त्यांनी ही संपत्ती लपवून ठेवली होती. जरासंधाने 100 राजांना पराभूत करण्याचे ध्येय गाठले, त्याआधी पांडवांनी त्याला युद्धासाठी आमंत्रित केले. जरासंधचे भीमासोबतचे युद्ध १३ दिवस चालले. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या युक्तीने भीमाने जरासंधाचा वध केला. त्याच्या मृत्यूने गुहेत ठेवलेल्या त्याच्या खजिन्याचे रहस्यही गाडले गेले. ब्रिटीश राजवटीत गुहेच्या आत तोफेचे गोळे फोडून आत जाण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण यश मिळाले नाही. वेळोवेळी आणखी बरेच प्रयत्न केले गेले, परंतु गुहेचे सत्य आजपर्यंत एक गूढच राहिले आहे. गुहेच्या भिंतीवर काही गुप्त शिलालेख देखील आहेत, जे अद्याप वाचलेले नाहीत. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की जो कोणी हे शिलालेख वाचेल त्याला खजिन्याचा मार्ग सापडेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात