जाहिरात
मराठी बातम्या / Viral / अबब...थेट राष्ट्रपतीपदाच्या रिंगणात लढाई! पावभाजीने जिंकली असंख्य मनं

अबब...थेट राष्ट्रपतीपदाच्या रिंगणात लढाई! पावभाजीने जिंकली असंख्य मनं

केवळ पोटापाण्याचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी पावभाजी बनवण्याची कला अवगत केली होती. त्यात ते इतके पारंगत झाले की...

केवळ पोटापाण्याचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी पावभाजी बनवण्याची कला अवगत केली होती. त्यात ते इतके पारंगत झाले की...

इथे लोक केवळ पावभाजी आवडते म्हणून नाही, तर तर ती बनवणारी व्यक्ती खास असल्यामुळे आवडीने खायला येतात.

  • -MIN READ Local18 Haryana
  • Last Updated :

धर्मबीर शर्मा, प्रतिनिधी  गुरुग्राम, 18 जून : पावभाजी आवडत नाही, असे फार कमी लोक पाहायला मिळतात. मात्र हरियाणाच्या गुरुग्राममध्ये लोक केवळ पावभाजी आवडते म्हणून नाही, तर तर ती बनवणारी व्यक्ती खास असल्यामुळे आवडीने खायला येतात. शिवाय या पावभाजीची चवही अतिशय स्वादिष्ट असते. सेक्टर 15 मध्ये मिळणारी ही पावभाजी कुशेश्वर भगत बनवतात, जे चक्क भारताचा राष्ट्रपती होण्यासाठी लढले आहेत. कुशेश्वर यांनी 5 वेळा निवडणूक रिंगणात आपलं नशीब आजमावलं. मात्र प्रत्यकेवेळी त्यांच्या पदरी निराशाच आली. राज्यसभा, लोकसभा अशा दोन्ही सभागृहांसाठी ते लढले आहेत. शिवाय त्यांनी राष्ट्रपतीपदासाठीही आपलं नामांकन दिलं होतं. विशेष म्हणजे बिहारहून मुंबईला येऊन ते पावभाजी बनवायला शिकले. मुंबईहून गुरुग्राममध्ये जाऊन त्यांनी पावभाजीचा व्यवसाय सुरू केला.

News18लोकमत
News18लोकमत

त्यांच्या पावभाजीचं वैशिष्ट्य असं की, ते ती शुद्ध बटरमध्ये बनवतात. त्यामुळे तिला एक वेगळीच चव येते. केवळ पोटापाण्याचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी पावभाजी बनवण्याची कला अवगत केली होती. त्यात ते इतके पारंगत झाले की, त्यांनी बनवलेल्या पावभाजीची चव लोकांच्या जिभेवर अगदी तरळत राहते. या चवीमुळेच त्यांना गुरुग्राममध्ये अनेकजण ओळखतात. NCP : शरद पवारांनी महिन्याभरापूर्वी पक्षात घेतलं, त्याचीच गाडी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फोडली याच ओळखीच्या जोरावर त्यांनी थेट भारताचे राष्ट्रपती होण्याचं स्वप्न पाहिलं आणि मैदानात उतरले. मात्र प्रत्येकवेळी त्यांना अपयश मिळालं. परंतु भलेही त्यांनी राजकीय रिंगणात बाजी मारली नसेल, तरीही पावभाजीने अनेकांची मनं जिंकून घेतली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात