विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी पंढरपूर, 18 जून : शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये 7 मे रोजी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. एवढच नाही तर राष्ट्रवादीने पंढरपूरचा उमेदवारही ठरवला अशी चर्चा या पक्ष प्रवेशानंतर झाली, पण याच्या एक महिन्याच्या आतच राष्ट्रवादीच्या नेत्याची गाडी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच फोडल्याची घटना घडली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांची गाडी राष्ट्रवादीच्याच कल्याण काळे समर्थकांनी फोडली आहे. या राड्यामध्ये एकाला मारहाणही करण्यात आली आहे. सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी आज शासकीय धान्य गोदामात पार पडली. अतिशय चुरशीने झालेल्या निवडणुकीत काय निकाल लागतो? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीमध्ये तब्बल 94.40 टक्के विक्रमी मतदान झालं होतं. वाढलेला मतांचा टक्का कुणाच्या पारड्यात कौल देतो याची उत्सुकता लागली होती. आमदार-खासदार गेले पण उद्धव ठाकरेंना आणखी संशय, सोबत असलेले ‘खबरे’ कोण? भारत भालके यांचे अकाली निधन, विठ्ठलच्या निवडणुकीत परिवारातील वारसांचा अभिजित पाटील गटाने दारूण पराभव केल्यानंतर विठ्ठल परिवारावर दोन्ही गटाकडून दावा सांगितला जात होता. मात्र, सहकार शिरोमणीच्या मतमोजणीनंतर कल्याण काळे गटाचा विजय झाला असला तरी परिवाराचा खरा नेता कोण? यावर शिक्कामोर्तब होण्या ऐवजी परिवारातील संघर्ष वाढणार की काय? असे वाटू लागले आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच काळे गटाचा जल्लोष आणि नंतर विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या गाडीवर केलेली दगडफेक आणि कार्यकर्त्याला केलेली मारहाण हे नेमके कशाचे द्योतक आहे? याची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीत सुरुवातीला सत्ताधारी काळे गटासाठी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अभिजित पाटील आणि दीपक पवार यांच्या युतीनंतर चुरशीची झाली. दोन्ही बाजूने देण्यात आलेले मजबूत पॅनल, प्रचारासाठी वापरलेल्या युक्ता, एकमेकांवर झालेले गांभीर आरोप-प्रत्यारोप यामुळे शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक प्रचंड चुरशीची झाली. भाजप प्रवेशाच्या चर्चा, पण पवारांनी भाकरी फिरवली, राष्ट्रवादीने विधानसभा उमेदवार ठरवला! गेल्या 20 वर्षांपासून कल्याणराव काळे यांच्याकडे सहकार शिरोमणी कारखान्याची धुरा आहे. ऊस आणि तोडणी वाहतूक बिले, कामगारांचे पगार, ऊस वजन काटा आदी मुद्यांवरून ही निवडणूक गाजली. परिवाराचा नेता कोण, 2024 च्या विधानसभेसाठी विठ्ठल परिवाराकडून भगीरथ भालके की अभिजित पाटील प्रबळ दावेदार याबाबतही चर्चा रंगल्या. पंढरपूर तालुक्यातील राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते, परंतु झालेली राडेबाजी बघता परिवार पुरता दुभंगला असल्याचे चित्र दिसत आहे. मतमोजणी केंद्रावर पहारा विठ्ठलच्या निवडणूक मतमोजणीमध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप माजी संचालक युवराज पाटील यांनी केला होता. याबाबत त्यांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. तसाच प्रकार या ठिकाणी घडू नये, म्हणून शुक्रवारी मतदान झाल्यावर मतदान केंद्रापासून मतपेट्या शासकीय गोडाऊनला आणेपर्यंत दोन्ही कार्यकर्ते अधिकाऱ्यांचा माग घेत होते. या पेट्या गोडाऊनमध्ये ठेवून सर्वांसमक्ष सील केल्यानंतरही पोलिसांसोबत दोन्ही गटांकडून 24 तास खडा पहारा होता. शनिवारी दुपारी कल्याणराव काळे यांनी शासकीय गोदामाला भेट दिली. त्यावेळी अभिजित पाटलांचे काही कार्यकर्ते तिथे आढळून आले. त्यावरून बाचाबाची झाली होती, त्यामुळे काही काळ तणावही निर्माण झाला होता. विजयी जल्लोषा मध्ये कल्याण काळे, भगीरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील ( सर्व राष्ट्रवादी) यांचे कार्यकर्ते आनंद घेत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना भेटीनंतर राष्ट्रवादीमध्ये अभिजित पाटील यांचे स्वागत झाले होते, पण एका महिन्याच्या आतच राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष समोर आला आहे. ‘2024 साठीही ठाकरे-राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री ठरला होता, पण…’, काय होता प्लान?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.