मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नाच्या आधीच मित्रांनी नवरदेवाची केली अशी अवस्था की ओळखणंही झालं कठीण; पाहा Video

लग्नाच्या आधीच मित्रांनी नवरदेवाची केली अशी अवस्था की ओळखणंही झालं कठीण; पाहा Video

सोशल मीडियावर सध्या एका नवरदेवाच्या हळदीचा व्हिडिओ व्हायरल (Haldi Ritual Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून हे समजणंही कठीण आहे, की तिथे हळदीचा कार्यक्रम सुरू आहे, की रंगपंचमी खेळली जात आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 08 ऑगस्ट : कोणत्याही भारतीय लग्नामध्ये (Indian Wedding) हळदीचा कार्यक्रम अत्यंत खास आणि महत्त्वाचा मानला जातो. यात नवरी आणि नवरदेव (Bride and Groom) दोघांचे नातेवाई आणि मित्र त्यांना हळद लावून नव्या जीवनाच्या सुरुवातीसाठी शुभेच्छा देतात. सोशल मीडियावर सध्या अशाच एका नवरदेवाच्या हळदीचा व्हिडिओ व्हायरल (Haldi Ritual Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून हे समजणंही कठीण आहे, की तिथे हळदीचा कार्यक्रम सुरू आहे, की रंगपंचमी खेळली जात आहे.

...अन् स्टेजवर नवरीसमोरच लोळायला लागला नवरदेवाचा मित्र; Wedding Video Viral

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर सध्या एका नवरदेवाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video of Groom) होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरदेव स्टूलवर बसलेला आहे. यानंतर नवरदेवाचे मित्र त्याला हळद लावायला सुरुवात करतात. आधी तर ते प्रेमानं हळद लावत असतात. मात्र, अचानक मस्तीच्या मूडमध्ये येतात. नवरदेवाच्या मित्रांनी जणू हा हळदीचा कार्यक्रम अधिक खास बनवण्यासाठी पूर्ण प्लॅन केला आहे.

बापरे! मजेमजेत चक्क सिंहाच्याच तोंडात टाकला हात; पुढे काय घडलं पाहा VIDEO

नवरेदवाच्या मित्र या कार्यक्रमात मस्ती करताना दिसत आहेत. आधी तर ते पॅकेटमध्ये भरलेली हळद नवरदेवाच्या डोक्यावर टाकतात. यानंतर पाण्यानं भरलेली एक बादली घेऊन येतात. व्हिडिओमध्ये दिसतं, की होणाऱ्या नवरदेवानं पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे आणि त्यानं काळा चश्मा लावला आहे. नवरदेवाला हळदीनं रंगवल्यानंतर मित्र त्याच्यावर पाणी टाकतात. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या नवरदेवाचं हास्य मन जिंकणारं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Bridegroom, Video viral, Wedding video