मराठी बातम्या /बातम्या /Viral /

काय म्हणावं याला! मजेमजेत चक्क सिंहाच्याच तोंडात टाकला हात; पुढे काय घडलं पाहा VIDEO

काय म्हणावं याला! मजेमजेत चक्क सिंहाच्याच तोंडात टाकला हात; पुढे काय घडलं पाहा VIDEO

सिंहाशी पंगा महागात पडला.

सिंहाशी पंगा महागात पडला.

पिंजऱ्यात असला तरी तो जंगलाचा राजा आहे, हे सिंहाने दाखवून दिलं.

मुंबई, 08 ऑगस्ट : जंगलाचा राजा सिंह (Lion) किती खतरनाक असतो आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे त्याला अगदी दुरून पाहिलं तरी घाम (Lion video)  फुटतो. त्याच्यासमोर जाण्याची हिंमत होत नाही. माणसंच नाही तर प्राणीही (Animal video) त्याच्यासमोर जायला घाबरतात.  पण एका व्यक्तीने ती हिंमत केली. फक्त सिंहाच्या जवळच तो गेला नाही तर सिंहाशी त्याने पंगाही घेतला आणि ते त्याला चांगलंच महागात पडलं (Man hand in lion's mouth).

पिंजऱ्यात आहे म्हणून त्याने सिंहाशी थट्टा करण्याचा प्रयत्न केला. पण ते त्याच्यावरच उलटलं आहे. आपण जंगलाचा राजा आहोत, हेच या सिंहाने दाखवून दिलं आहे. धक्कादायक (Shocking video) पण मजेशीर (Funny video) असा हा व्हिडीओ (Viral video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.

Paro Pawargar नावाच्या फेसबुक युझरने आपल्या फेसबुकवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ एखाद्या प्राणीसंग्रहायातील असावा. कारण सिंह पिंजऱ्यात आहे.

हे वाचा - VIDEO : गजराजाला आला राग; हत्तीने शेपटी धरून मगरीला पाण्यातच आपट आपट आपटलं

व्हिडीओत पाहू शकता सिंह पिंजऱ्याच्या आता आणि ती व्यक्ती त्या पिंजऱ्याच्या बाहेर. पण त्या व्यक्तीचा एक हात पिंजऱ्याच्या आत आहे, तोसुद्धा सिंहाच्या तोंडात. सिंहाने त्याचा एक हात आपल्या तोंडात घट्ट धरून ठेवला आहे. ती व्यक्ती आपला हात सिंहाच्या जबड्यातून खेचण्याचा प्रयत्न करते. आपल्या दुसऱ्या हाताने तो सिंहाच्या डोक्यावरही मारतो जेणेकरून तो तोंड उघडेल. पण सिंह अधिकच आक्रमक होतो आणि त्याचा हात आणखी घट्ट धरतो.

सिंह काही त्या व्यक्तीचा हात आपल्या जबड्यातून सोडायला तयार नाही.  या व्यक्तीने सिंहाशी पंगा घेतला आणि सिंहाने त्याला चांगलीच अद्दल घडवली. या व्यक्तीला आपण आयुष्यात केलेली ही सर्वात मोठी चूक असावी असंच वाटलं असावं. तो जिवाच्या आकांताने ओरडतो आहे, मदत मागतो आहे. त्याच्या आजूबाजूला लोक आहेत, पण भीतीने कुणीच पुढे यायला बघत नाही.

हे वाचा - अरे बापरे! कुणाच्या हातात कुणाच्या गळ्यात, सापांना घेऊन रस्त्यात फिरतायेत लोक; पाहा VIDEO

सुदैवाने हा पिंजरा आहे म्हणून नाहीतर सिंहाने त्या व्यक्तीचं काय केलं असतं, याची कल्पना न केलेलीच बरी. व्हिडीओ पाहून जितकी धडकी भरते, तितकंच हसूही येतं आहे. या व्हिडीओवर तशाच मजेशीर कमेंटही येत आहे. एका युझरने तर ये हाथ मुझे दे दे ठाकूर अशीच प्रतिक्रिया दिली आहे.

First published:

Tags: Shocking viral video, Viral, Viral videos, Wild animal