Home /News /viral /

फक्त प्रौढच घेऊ शकतात या खास आईस्क्रीमचा आस्वाद; अजब आहे यामागचं कारण

फक्त प्रौढच घेऊ शकतात या खास आईस्क्रीमचा आस्वाद; अजब आहे यामागचं कारण

हे दोन्ही फ्लेवर इतर आईस्क्रीमपेक्षा थोडे हटके आहेत. कारण कंपनीनं या फ्लेवरमध्ये अल्कोहोलचा वापर केला (Alcoholic Ice Cream) आहे.

    नवी दिल्ली 03 ऑक्टोबर : आईस्क्रीमचं नाव ऐकताच लहान मुलं आनंदानं उड्या मारू लागतात. मात्र, आता आईस्क्रीम ब्रॅण्डमधील मोठं नाव असलेली कंपनी हॅगन डेज (Häagen-Dazs) यांनी अशी आईस्क्रीम बनवली आहे जी लहान मुलं खाऊ शकत नाहीत. हा फ्लेवर विशेषतः प्रौढांसाठी बनवला गेला (Ice Cream For Adults-Only) आहे. कारण ही आईस्क्रीम खाताच एक वेगळीच नशा चढू लागते. लग्नातच नवरदेवाने दाखवले नको ते रंग; रागाने लालभडक झाली नवरीबाई; Video viral हॅगन डेज नावाच्या आईस्क्रीम ब्रॅण्डनं बाजारात दोन नवे फ्लेवर लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फ्लेवर इतर आईस्क्रीमपेक्षा थोडे हटके आहेत. कारण कंपनीनं या फ्लेवरमध्ये अल्कोहोलचा वापर केला (Alcoholic Ice Cream) आहे. हे खास आईस्क्रीम फ्लेवर्स याच महिन्यात लॉन्च होणार आहेत. Daily Mail च्या वृत्तानुसार, कंपनीनं आपल्या कोजी कॉकटेल कलेक्शनअंतर्गत (Cozy Cocktail Collection) केवळ प्रौढांसाठी हे फ्लेवर्स लॉन्च केले आहेत. अॅडल्ट ओनली फ्लेवर्स (adults-only flavors) लंडनच्या कॉकटेल वीकच्या मुहूर्तावर लॉन्च केले जाणार आहेत. या फ्लेवर्समध्ये रम सॉल्टेड कॅरेमल अॅण्ड बिस्किट (Rum Salted Caramel and Biscuit) आणि आयरिश व्हिस्की अॅण्ड चॉकलेट वोफलचा समावेश आहे. या दोन्ही आईस्क्रीम खाल्ल्यानंतर थोडीशी नशा चढल्यासारखी वाटेल मात्र हे लोक अजिबातही नशेत नसतील. रम आणि व्हिस्की फ्लेवर्ड आईस्क्रीमच्या प्रत्येक टबमध्ये 0.5 टक्क्याहून कमी अल्कोहोलचा वापर केला गेला आहे. एका बॉक्सची किंमत सुमारे 500 रुपये इतकी आहे. VIDEO: तोल गेला अन् धाडकन पाण्यात कोसळला सिंह, पाहा पुढे काय घडलं आईस्क्रीमचे दोन्ही फ्लेवर्स सामान्य आकाराच्या टब्ससोबतच लहान टब्समध्येही उपलब्ध आहेत. याआधी हॅगन डेज ब्रॅण्डचं स्पिरीट कलेक्शन भरपूर हिट ठरलं होतं. हे 2020 मध्ये लॉन्च झालेलं. या अमेरिकन आईस्क्रीम मेकींग ब्रॅण्डचा रोज अॅण्ड क्रीम फ्लेवरही लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. Haagen Dazs रूबेन अॅण्ड रोज मेट्स यांनी 1960 मध्ये न्यूयॉर्क शहरात सुरू केलेलं. सुरुवातीला व्हॅनिला, कॉफी आणि चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम बनवणारी ही कंपनी आता जगातील आईस्क्रीमचा टॉप ब्रॅण्ड आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Tasty food, Viral news

    पुढील बातम्या