लग्नातच नवरीसमोर नवरदेवाचं खरं रूप आलं. तेव्हा मेकअपने गुलाबी केलेला तिचा चेहरा रागाने अक्षरशः लालभडक झाला आणि फुग्यासारखा फुगला. नेमकं नवरदेवानं असं केलं तरी काय? हे वाचा - सर्वांसमोरच हातात हात धरला आणि दिराच्या लग्नात वहिनीचा धिंगाणा; पाहा VIDEO nikan_dusky इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता नवरदेव स्टेजवर उभा आहे. पण त्याच्या शेजारी नवरी कुठे दिसत नाही. नवरदेवाच्या शेजारी दोन तरुणी आहेत. एक नवरदेवाच्या एका बाजूला तर दुसरी दुसऱ्या बाजूला उभी आहे. दोघींच्याही हातात फूल आहे. दोघीही नवरदेवाला फूल देताना दिसत आहेत. तरुणींना आपल्याला फूल देताना पाहून नवरदेवाला इतका आनंद झाला आहे, जणू काही त्याने जगच जिंकलं असं वाटतं आहे. अगदी हसत हसत नवरदेव या तरुणींसोबत बोलताना, फोटो काढताना दिसतो आहे. आपली नवरी आपल्यासोबत नाही, याचंही त्याला भान नाही. तरुणींच्या नादात नवरदेवाला नवरीचा विसर पडलेला दिसतो आहे. तरुणींसोबत तो अगदी असं वागतो आहे, जणू तरुणींसोबत मजामस्ती करण्यात तो तरबेजच आहे. हे वाचा - नवऱ्याने दिली अफेअर करायची सूट; काही दिवसांतच बायकोने दिली Shocking news बरं त्याचा हा सर्व प्रताप त्याची नवरी दूरून पाहते आहे. स्टेजवर पण नवऱ्यापासून दूर नवरीबाई उभी आहे. तिची मैत्रीणही तिच्यासोबत आहे. नवरी खूपच रागात दिसते आहे. तिची मैत्रीणसुद्धा नवरदेवाला असंकाही तरी करताना पाहून शॉक झाली आहे. ती नवरीसोबत काही तरी बोलते आणि नवरीचा राग अधिकच चढतो. आता ही नवरी नवरदेवाची चांगलीच धुलाई करणार असंच हा ्व्हिडीओ पाहून वाटतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Viral, Viral videos, Wedding video