नवी दिल्ली 03 ऑक्टोबर : जंगलाच्या दुनियेत सिंहाचा (Lion) जो दरारा आहे त्याची कल्पना सगळ्यांनाच आहे. सिंहाचं डरकाळी ऐकूनच संपूर्ण जंगलातील प्राणी घाबरून जातात. त्यामुळे, प्रत्येक प्राणी सिंहापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो. मात्र, अनेकदा सिंह असं काही करतात ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. सध्या सिंहाचा असाच एक जुना व्हिडिओ (Viral Video of Lion) इंटरनेटवर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. यात दोन सिंह अतिशय आरामात एका पाण्याच्या खड्ड्याच्या कडेला फिरताना दिसत आहेत. मेहुणीला पाहताच सुटला भावोजींच्या मनाचा ताबा, सर्वांसमोरच केला धिंगाणा; VIDEO व्हिडिओमध्ये दोन सिंह अतिशय आरामात पाण्याच्या खड्ड्याच्या कडेला फिरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ @hopkinsBRFC21 नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट केला गेला आहे. आतापर्यंत हजारो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हा व्हिडिओ जर्मनमधील एका प्राणीसंग्रहालयातील आहे. यात दोन सिंह खड्ड्याच्या कडेला फिरताना दिसतात. दोन्ही सिंह आरामात फिरत असतानाच यातील एकाचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या खड्ड्यात जाऊन कोसळला. यानंतर जे घडलं ते पाहण्यासारखं होतं.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की दोन्ही सिंह अतिशय आरामात पाण्याच्या खड्ड्याच्या शेजारी फिरत आहेत. दोघांना पाहून असं वाटतं की ते फिरण्यासाठी निघाले आहेत. मात्र काही अंतरावर जाताच यातील एका सिंहाचा पाय घसरतो आणि तो पाण्याच्या खड्ड्यात कोसळतो. पाण्यात पडताच हा सिंह स्वतःला सावरतो आणि पोहत किनाऱ्यावर येतो. यानंतर तो पाण्यातून बाहेर निघतो. लेकाने केला भलताच प्रयोग, जीव मुठीत धरून राहिले वडील; पाहा VIDEO सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. या व्हिडिओ मजेशीर कॅप्शनही देण्यात आलं आहे. यात लिहिलं आहे, तुला काय म्हणायचंय, मी पडलो? मी फक्त पोहण्यासाठी गेलो होतो. लोक या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत आहेत. एका यूजरनं म्हटलं, पडण्याआधी अभिमान वाटतो. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की सिंहाचा तोल जाताना खूपच कमी लोकांनी पाहिलं असेल. याशिवाय अनेकांनी हा व्हिडिओ शेअरही केला आहे.

)







