मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाच्या बहिणीची अजब मागणी; ऐकून सगळेच हैराण, मंडपातच तुटलं नातं

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाच्या बहिणीची अजब मागणी; ऐकून सगळेच हैराण, मंडपातच तुटलं नातं

नवरीनं सांगितलं, की नवरदेवाच्या बहिणीला शाकाहारी जेवण आवडत होतं आणि तिनं लग्नाआधीच सांगतिलं होतं की लग्नातील भोजन शाकाहारी पाहिजे

नवरीनं सांगितलं, की नवरदेवाच्या बहिणीला शाकाहारी जेवण आवडत होतं आणि तिनं लग्नाआधीच सांगतिलं होतं की लग्नातील भोजन शाकाहारी पाहिजे

नवरीनं सांगितलं, की नवरदेवाच्या बहिणीला शाकाहारी जेवण आवडत होतं आणि तिनं लग्नाआधीच सांगतिलं होतं की लग्नातील भोजन शाकाहारी पाहिजे

  • Published by:  Kiran Pharate
लंडन 22 ऑक्टोबर : ब्रिटनमधील (Britain) एका लग्नात लग्नाच्या दिवशीच (Wedding Day) नवरदेवाच्या बहिणीनं अशी काही मागणी केली, ज्यामुळे नातं जोडलं जाण्याआधीच तुटलं. नवरदेवाच्या बहिणीने केलेली मागणी (Demand of Groom’s Sister) पूर्ण करण्याचा नवरीच्या घरच्यांनी प्रयत्नही केला, मात्र पूर्ण मनापासून नाही. यामुळे नाराज झालेल्या नवरदेवाच्या बहिणीनं एकच गोंधळ घातला आणि हे नातं तोडण्याचा निर्णय घेतला. लोकांचे टॉयलेट साफ करून 'ती' बनली लखपती; फक्त 3 दिवसांचा पगार वाचूनच चक्कर येईल मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, सोशल मीडिया अॅप रेडिटवर (Social Media App Reddit) नवरीनं स्वतः या घटनेचा खुलासा केला आहे. नवरीनं सांगितलं, की नवरदेवाच्या बहिणीला शाकाहारी जेवण आवडत होतं आणि तिनं लग्नाआधीच सांगतिलं होतं की लग्नातील भोजन शाकाहारी पाहिजे. तिनं धमकीही दिली होती, की असं न केल्यास परिणाम वाईट होतील. नवरदेवाच्या बहिणीची ही अजब अट ऐकून सगळेच हैराण होते. मात्र कोणालाच असं वाटलं नाही की ही गोष्ट अगदी नातं तोडण्यापर्यंत पोहोचेल. लग्नात नवरदेवाच्या बहिणीच्या आवडीनुसार पूर्णपणे शाकाहारी जेवण बनवलं गेलं नाही. नवरीकडच्या लोकांचं असं म्हणणं होतं, की त्यांच्याकडे बाहेरचे अनेक पाहुणे आले आहेत, त्यामुळे असं करणं शक्य नाही. जेव्हा नवरदेवाच्या बहिणीला हे समजलं की लग्नात मांसाहारी जेवणही बनवण्यात आलं आहे, तेव्हा ती नाराज झाली. तिनं यानंतर हा निर्णय सुनावला की ती नवरीच्या घरच्यांसोबतचं आपलं नातं तोडत आहे. नवरदेवाच्या घरचेही नाराज झाले, की त्यांची एवढी मागणीही पूर्ण केली गेली नाही. पुरुष डान्सरची सर्जरी करत महिला बनवलं; पत्नीप्रमाणे ठेवलं, मग दिला मोठा धोका रिपोर्टमध्ये या गोष्टीबाबत खुलासा केलेला नाही, की हे नातं पुढे कायम राहिलं की नवरदेवानंही आपल्या बहिणीची बाजू घेत लग्न मोडलं. सोशल मीडियावर अनेकांनी नवरीची बाजू घेत नवरदेवाच्या बहिणीनं अशी मागणी करणं चुकीचं असल्याचं म्हटलं. तर काही लोकांनी तिचं समर्थनही केलं. काहींचं असं म्हणणं आहे, की ही अगदी लहानशी मागणी होती, जी पूर्ण करणं शक्य होतं.
First published:

Tags: Viral news, Wedding

पुढील बातम्या