मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लोकांचे टॉयलेट साफ करून 'ती' बनली लखपती; फक्त 3 दिवसांचा पगार वाचूनच चक्कर येईल

लोकांचे टॉयलेट साफ करून 'ती' बनली लखपती; फक्त 3 दिवसांचा पगार वाचूनच चक्कर येईल

तुम्ही कदाचित महिनाभरातही कमवत नसाल तितकी ही मोलकरीण फक्त तीन दिवसांत कमवते.

तुम्ही कदाचित महिनाभरातही कमवत नसाल तितकी ही मोलकरीण फक्त तीन दिवसांत कमवते.

तुम्ही कदाचित महिनाभरातही कमवत नसाल तितकी ही मोलकरीण फक्त तीन दिवसांत कमवते.

मुंबई, 21 ऑक्टोबर : सर्वसामान्य मध्यमवर्गीय नोकरदारांना घरकाम करणाऱ्या महिलांची गरज भासते. घरकाम करणाऱ्या कित्येक महिला देशात असून, या महिला गरीब आणि असहाय असतात, असा अनेकांचा समज असतो. लिहिता आणि वाचता न येणाऱ्याच महिला नाईलाजाने दुसऱ्याच्या घरी भांडी धुणं, साफसफाई अशी कामं करून थोडे पैसे कमावतात आणि आपला उदरनिर्वाह करतात, असंही काहींना वाटतं. तुम्हालाही असं वाटत असेल तर अमेरिकेतल्या (America) घरकाम करणाऱ्या केटियाचं (Ketia) उत्पन्न ऐकून तुमचा गैरसमज दूर होईल. काही जणांशी ऑनलाइन संवाद साधताना केटियाने आपल्या साफसफाई व्यवसायाबद्दल (Cleaning Business) चर्चा केली. तेव्हा तिचं उत्पन्न ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ती केवळ तीन दिवसात 720 युरो म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 80 हजार रुपये कमावत (Millionaire Cleaner) असल्याचं तिने सांगितलं.

केटिया अमेरिकेत अलाबामा (Albama) इथे राहते. घरकाम करत असताना आलेले अनुभव यावेळी तिने शेअर केले. 'मी कामाला जाते, त्यांच्या घरातली बाथरूम्स (Bathroom) आणि शौचालयं (Toilet) स्वच्छ करते, हे माहिती झाल्यानंतर अनेकांनी माझी थट्टा केली. अपमान करण्याचा प्रयत्न केला; मात्र या गोष्टींमुळे मला काहीच फरक पडत नाही. मला माझं काम आवडते. पहिल्यापासून मला स्वच्छता करण्याची आवड होती. त्यामुळे तोच मी माझा व्यवसाय बनवला,' असं तिने सांगितलं.

हे वाचा - या दाढीवाल्या महिलेला पाहताच दिवाने होतात पुरुष; आपल्या बोल्ड अदांनी करते घायाळ

केटियाने स्वतःचा क्लीनिंग बिझनेस सुरू केला आहे. तिचं उत्पन्न भरपूर असल्याने तिला करही भरावा लागतो. सहसा परदेशात घरकाम करणाऱ्या महिला पुरवण्यासाठी काही कंपन्या असतात. या कंपन्यांद्वारे महिलांना घरकाम दिलं जातं. यात महिलांना सुरक्षिततेची हमी दिली जाते; मात्र त्यात दलालच (Broker) स्वतः जास्त पैसे कमावतात. त्यामुळे नोकरी करण्याऐवजी स्वतःचा बिझनेसच सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं तिने सांगितलं. ती फक्त तीन दिवसांत 80 हजार रुपयांपर्यंत कमाई करते.

हे वाचा - 45 वेळा केलाय विमानानं प्रवास; महिन्याला 75 हजार रुपये कमवतं हे 1 वर्षाचं बाळ

केटियाचं 'टिक-टॉक'वरदेखील (Tik Tok) अकाउंट आहे. आपल्या 'टिक-टॉक'वरून ती बाथरूम आणि शौचालय स्वच्छ करतानाचे व्हिडिओ टाकते. केटियाचे टिकटॉक व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तिचे व्हिडिओ व्हायरल झाले असून, अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. आता आपणही नोकरी सोडून स्वतःचा क्लीनिंग बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असल्याचं काही लोकांनी म्हटलं आहे. क्षेत्र कोणतंही असो, कामाची लाज न बाळगता पडेल ते काम केलं तर आयुष्यात काही कमी पडत नाही, हे मात्र खरं.

First published:

Tags: Job, Money, Viral