नवी दिल्ली 22 ऑक्टोबर : डान्स पार्टीमध्ये (Dance Party) ढोल वाजवणाऱ्या उरुवा येथील एका व्यक्तीनं विवाहित पुरुष डान्सरची (Married Male Dancer) धोका देत सर्जरी करून त्याला महिला बनवलं (Sex Reassignment Surgery) . यानंतर काही काळ त्याला पत्नीप्रमाणे आपल्यासोबत ठेवलं आणि मग डान्सरची सगळी कमाई घेऊन फरार झाला. गोला क्षेत्रात राहणाऱ्या पीडिताने आरोपीविरोधाच चोरी, एससीएसटीसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, पीडित व्यक्ती विवाहित असून त्याला मुलंही आहेत. तो गोला बाजारमधील डीजेमध्ये डान्सर होता. जून 2020 मध्ये त्याची भेट उरुवा बाजारच्या भरवलिया येथील रहिवासी मो. मुमताज याच्यासोबत झाली. मुमताज ढोलकी वाजवत असे. मुमताजने त्याला म्हटलं की इथे डीजेवर डान्स करून 100 ते 200 रुपयेच मिळतात. दिल्लीमध्ये 500 ते 1000 रुपये मिळतात. तू माझ्यासोबत दिल्लीला चल. पीडितही त्याचं हे बोलणं ऐकून नोव्हेंबर 2020 मध्ये दिल्लीला गेला. तिथे मुमताजनं त्याला काहीतरी खायला दिलं यामुळे त्याची तब्येत बिघडली. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा समजलं की त्याची सर्जरी कऱण्यात आली असून आता तो स्त्री झाला आहे. 9 तास गाडी चालवत प्रियकराला भेटायला गेली तरुणी; त्या अवस्थेत पाहून बसला धक्का मुमताजनं या पीडिताची त्याच्या नकळत सर्जरी करवून घेतली आणि त्याला महिला बनवलं. डान्सरनं याचा विरोध केला असता आता काहीच होऊ शकत नाही, असं मुमताजने सांगितलं. दिल्लीत काही दिवस राहिल्यानंतर मुमताज त्याला घेऊन गोरखपूरमध्ये आला. इथे तो स्वतः ढोल वाजवत आणि पीडिताला डान्स करायला लावत असे. यातून जे पैसे मिळत असे ते मुमताज आपल्याजवळ ठेवत असे. डान्सरच्या म्हणण्यानुसार, मुमताज सांगत असे की तो अविवाहित आहे. आम्ही दोघंही पती पत्नीप्रमाणे राहून पैसे कमवू लागलो. डान्सरनं आरोप केला की ३ ऑक्टोबरला मुमताज त्याला आपल्या भरवलिया या गावी घेऊन गेला. तिथे गेल्यावर समजलं की मुमताज विवाहित आहे आणि त्याला मुलंही आहेत. हे समजताच डान्सरला धक्का बसला. त्यानं ठाण्यात केस करण्याचं बोलताच मुमताजनं त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला दिला रोज थोडा-थोडा मृत्यू;पत्नीचा कांड वाचून हादराल डान्सरचा आरोप आहे, की त्या रात्री तो मुमताजच्या घरीच झोपला. सकाळी उठला तेव्हा समजलं की त्याच्या बॅगेतील दहा लाख रुपये, ४ लाख किमतीचे सोनं आणि चांदीचे दागिने आणि इतर सामान घेऊन मुमताज, त्याची पत्नी आणि मुलं फरार झाले आहेत. यानंतर पीडितानं पोलिसांत तक्रार केली. एसएसपीच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.